विद्यार्थ्यांचे अधिक संख्येने संघटन व्हावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न विनाविलंब मार्गी लागावेत यासाठी मनसेचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी महाविद्यालयांमध्ये कॉलेज युनिट स्थापन करण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे मंगळवारी डोंबिवलीतील चार महाविद्यालयांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी कॉलेज युनिट स्थापन केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

डोंबिवलीतील आयरे येथील एकनाथ मढवी महाविद्यालय, दत्तनगर मधील स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालय, के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय येथे मनसे विद्यार्थी सेनेतर्फे कॉलेज युनिट मंगळवारी स्थापन करण्यात आली. आ. प्रमोद पाटील यांनी मनसे पदाधिकारी, विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मनसे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत, महिला आघाडीच्या दीपिका पेडणेकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई, शहर सचिव अरुण जांभळे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

डोंबिवलीत महाविद्यालयांमध्ये कॉलेज युनिट स्थापन करताना विद्यार्थी अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतात. त्या मांडण्यासाठी, सोडविण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध नसते. यासाठी कॉलेज युनिट ही संकल्पना महत्वाची भूमिका बजावेल असे मनसे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांनी युवा पदाधिकाऱ्यांना डोंबिवलीतील गेल्या महिन्यातील दौऱ्याच्या वेळी सांगितले होते. या आदेशाप्रमाणे कॉलेज युनिट स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे.

महाविद्यालयातील संस्था पदाधिकारी, प्राचार्य यांच्याशी चर्चा करून ही युनिट स्थापन केली जात आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले.

या उपक्रमात मनसेचे प्रीतेश म्हामुणकर, यतिन पाडगावकर, परेश भोईर, प्राजक्ता देशपांडे, निखिल जोशी, कुणाल मौर्य, चिन्मय वारंगे, रमा म्हात्रे, ललित पाटील, उदय वेळासकर, प्रवीण केणे, रतिकेश गवळी, मोहन हेबळे, प्रीतेश पाटील सुहास काळे, रुतिक कदम पदाधिकारी सहभागी झाले होते.