कल्याण- टिटवाळा-मांडा भागात बल्याणी परिसरात सरकारी जमिनींवर भूमाफियांनी गेल्या काही दिवसांपासून चाळी, गाळ्यांची बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांमुळे टिटवाळा शहराचे नियोजन बिघडत असल्याने ही सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या पथकाने सुरू केली आहे.

हेही वाचा- भिवंडीजवळील पिंपळगावात रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम; राजकीय दबावामुळे अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात अडथळे

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
Farmers in Navi Mumbai Airport Notified Impact Area oppose amended DCPR
नैनातील शेतकऱ्यांचा सूधारित युडीसीपीआरला विरोध

मागील अनेक महिन्यांपासून ही कामे सुरू होती. परंतु, तत्कालीन अधिकारी, तोडकाम पथकाने बेकायदा बांधकामे सुरू असुनही या बांधकामांवर कारवाई केली नाही. अ प्रभागाचा नव्याने पदभार घेतलेले साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी प्रभाग हद्दीची पाहणी करत असताना त्यांना प्रभागात मोठ्या प्रमाणात सरकारी, मोकळ्या जमिनींवर बेकायदा चाळी, व्यापारी गाळे यांची बांधकामे भूमाफियांकडून सुरू आहेत अशी माहिती मिळाली.
या भूमाफियांकडे बांधकाम, जमिनीची कागदपत्रे साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांनी मागितली. ती त्यांच्याकडे आढळून आली नाहीत.

अ प्रभागात स्वतंत्र अतिक्रमण नियंत्रण विभाग असुनही यापूर्वी या बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याने तक्रारदार नागरिकांमध्ये नाराजी होती. सोमवार, मंगळवारी ही सर्व बेकायदा बांधकामे तोडण्याचे नियोजन करुन अ प्रभागातील तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, अतिक्रमण नियंत्रण अधीक्षक स्वाती गरुड, तोडकाम पथकातील पी. के. भालेराव, एस. पी. सोनावणे, एम. एल. शेवाळे, एम. के. चिकणकर यांच्या पथकाने दोन दिवसाच्या कालावधीत टिटवाळा, मांडा भागातील मोकळ्या जमिनी, सरकारी जमिनींवर सुरू असलेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईत ५० हून अधिक चाळी, चाळी बांधण्यासाठी बांधलेले ४० जोते, व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्यात आले.

हेही वाचा- दोन हजार कोटींच्या कामांसाठी एकाच दिवसात निविदा; ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण

मागील अनेक महिन्यात टिटवाळा परिसरात एवढी मोठी तोडकामाची कारवाई झाल्याने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चाळीमधील एक खोली तीन ते पाच लाख रुपयांना विकून भूमाफिया कमाई करत होते. कारवाई होत असताना माफिया त्या ठिकाणाहून पळून जात असल्याने या बेकायदा बांधकामात घर घेणाऱ्यांना कोणी वाली नसल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा- डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली घोषणा

अ प्रभाग हद्दीतील टिटवाळा, मांडा, बल्याणी, मोहने, आंबिवली परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. टप्प्याने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत. चाळी, गाळे पाडून झाल्यानंतर बेकायदा इमारतींवर कारवाई सुरू केली जाणार आहे. ही मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी दिली.