कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर | Motorists suffer due to arching at Vijayanagar in Kalyan East amy 95 | Loksatta

कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर

कल्याण पूर्वेतील विजयनगर भागातील मुख्य वर्दळी्च्या रस्त्यावर शिवसेना संजय गायकवाड प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव काळात नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भव्य कमान उभारली आहे.

कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर
कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त

कल्याण पूर्वेतील विजयनगर भागातील मुख्य वर्दळी्च्या रस्त्यावर शिवसेना संजय गायकवाड प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव काळात नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भव्य कमान उभारली आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभारलेली ही कमान नवरात्रोत्सव सुरू झाला तरी काढण्यात येत नसल्याने नागरिक, वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम

या कमानीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. या कमानीवर प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या छब्या लावण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव सुरू झाला आहे तरी शिवसेनेतर्फे ही कमान काढली जात नसल्याने नक्की ही कमान रस्त्यावर कायम ठेवण्याचे कारण काय, असे प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत. शिवसेनेचा एकही ज्येष्ठ पदाधिकारी ही कमान काढून टाकावी म्हणून प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांना सूचवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध भागात बेकायदा फलक हटविण्याची मोहीम सतत सुरू असते. मग ही कमान पालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. एका वजनदार व्यक्तिचे नाव फलकावर असल्याने स्थानिक नागरिक याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल

संजय गायकवाड प्रतिष्ठानने स्वताहून कमान काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून कार्यवाही होत नसेल तर पालिका ती कमान काढण्याचे काम करणार आहे. – हेमा मुंबरकर , साहाय्यक आयुक्त , ड प्रभाग, कल्याण

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम

संबंधित बातम्या

ठाण्यात पाणी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; पंधरा दिवसांत २ कोटी  ९५ लाखांची थकित रक्कम वसुल
शहापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई
ठाण्यात १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, सहा जणांना अटक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात