scorecardresearch

महावितरणचे वीज देयक भरणा केंद्र शनिवारी सुरू

ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी एप्रिलअखेर शनिवारी (३० एप्रिल) वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले.

कल्याण – ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी एप्रिलअखेर शनिवारी (३० एप्रिल) वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले.  कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी व जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवारी सुरू राहतील. या उपलब्ध सुविधेसह वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे महावितरणकडून करण्यात आले आहे.

अधिकृत वीज बिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपवर वीज बिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत.  http://www.mahadiscom.com या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीज बिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे आदी) उपयोग करून घरबसल्या वीज बिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा आहे. वीज बिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीज बिल भरणे सुलभ होते. अखंडित वीजसेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msedcl electricity payment center starts saturday customers electricity ysh

ताज्या बातम्या