scorecardresearch

मुजोर वाळू माफियांचा अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न; जिल्हा प्रशासनाकडून चार कोटींचा मुद्देमाल नष्ट

मुंब्रा-दिवा खाडीत वाळू माफियांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या जिल्हा महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बुधवारी काही वाळू माफियांनी दगड आणि मद्दय़ाच्या बाटल्या फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

ठाणे : मुंब्रा-दिवा खाडीत वाळू माफियांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या जिल्हा महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बुधवारी काही वाळू माफियांनी दगड आणि मद्दय़ाच्या बाटल्या फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत वाळू माफियांचा ४ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. हल्ल्याचा प्रयत्न झाला तरी वाळू तस्करांविरोधात कारवाई सुरूच राहील अशी माहिती ठाणे उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे यांनी दिली.
या घटनेनंतर वाळू माफिया खाडीत उडय़ा टाकून पसार झाले असून त्यांचा विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महसूल विभागामार्फत ही धडक कारवाई करण्यात आली. महसूल विभागाचे ५० जणांचे पथक तीन बोटींमधून मुंब्रा-दिवा खाडीत कारवाई करण्यासाठी पोहोचले. अधिकाऱ्यांच्या बोटी पाहताच वाळू तस्करांनी त्यांच्या बोटींच्या दिशेने दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या भिरकावल्या. मात्र, सुदैवाने कोणीही अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले नाहीत. यांनतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा आल्याने वाळू तस्कर खाडीत उडय़ा मारून पसार झाले. महसूल अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा तब्बल ४ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. यामध्ये एकूण ५ बोटी पाण्यात जाळून टाकण्यात आल्या आहेत. तसेच ६ बार्ज, ८ सक्शन पंप बुडवण्यात आले असून ३ मोठे २५ ब्रासचे बार्ज जप्त करून मुंब्रा गणेश घाट येथे विल्व्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आले आहेत.
वाळू माफियांचा अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न
धडक कारवाई करण्यात आली. महसूल विभागाचे ५० जणांचे पथक तीन बोटींमधून मुंब्रा-दिवा खाडीत कारवाई करण्यासाठी पोहोचले. अधिकाऱ्यांच्या बोटी पाहताच वाळू तस्करांनी त्यांच्या बोटींच्या दिशेने दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या भिरकावल्या. मात्र, सुदैवाने कोणीही अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले नाहीत. यांनतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा आल्याने वाळू तस्कर खाडीत उडय़ा मारून पसार झाले.
महसूल अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा तब्बल ४ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. यामध्ये एकूण ५ बोटी पाण्यात जाळून टाकण्यात आल्या आहेत. तसेच ६ बार्ज, ८ सक्शन पंप बुडवण्यात आले असून ३ मोठे २५ ब्रासचे बार्ज जप्त करून मुंब्रा गणेश घाट येथे विल्व्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आले आहेत.
कारवाई करण्यासाठी गेलो असताना वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला. पथकामध्ये महिला कर्मचाऱ्यांचादेखील समावेश होता. यामध्ये अधिकाऱ्यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. जिल्हा प्रशासन वाळू तस्करांच्या हल्ल्याला भीक घालणार नसून यापुढेही वाळू माफियांविरोधात धडक कारवाई करण्यात येईल. – अविनाश शिंदे, उपविभागीय दंडाधिकारी, ठाणे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mujor sand mafia attempts attack officials district administration destroys property rs 4 crore amy

ताज्या बातम्या