ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानक जवळ झालेल्या अपघात प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने प्रवासी संघ नाराजी व्यक्त करत आहे. गर्दीमुळे लोकलमधून खाली पडल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. DRM यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने केली.
जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देणे गरजेचे आहे. मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन आणि उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी यापूर्वी अनेक वेळा विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), महाव्यवस्थापक (GM) आणि रेल्वे बोर्डकडे दिवा ते कळवा या जीवघेण्या मार्गाबाबत तक्रार केली आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक प्रवाशांनी प्राण गमावले आहेत.
कल्याण ते ठाणे दरम्यानच्या दोन नवीन मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक लोकल सेवा मिळेल अशी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन प्रसंगी अधिक लोकल सेवेचे आश्वासन दिले होते. मात्र, DRM यांनी हा निर्णय उलटवून या मार्गांवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले.
आजची दुर्घटना ही मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या विलंबामुळे लोकल थांबवण्याच्या धोरणामुळे घडली आहे. गर्दी आणि असुरक्षित प्रवास हे या धोरणाचे थेट परिणाम आहेत. आम्ही या प्रशासनाच्या अपयशाचा तीव्र निषेध करतो. या अपघाताची जबाबदारी DRM ने स्वीकारावी. रेल्वे बोर्डने मुंबई लोकल रेल्वे व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि स्वतंत्र मुंबई लोकल प्रशासन निर्माण करावे. असे संघाने निवेदनात म्हंटले आहे.
तसेच त्यांनी मागण्या केल्या त्या खालील प्रमाणे
१. जखमींना तातडीने वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी.
२. कल्याण ते कुर्ला दरम्यान केवळ लोकलसाठी चार मार्ग राखून ठेवावेत.
३. गर्दीच्या वेळेत मेल/एक्सप्रेस गाड्यांना या मार्गांवर चालवले जाऊ नये.
४. मुंबई लोकलसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था निर्माण करावी.