ठाणे : जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला मुंब्रा बाह्यवळण मार्ग (मुंब्रा बायपास) आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे रविवारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण शहरात वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे. हलक्या वाहनांना मुंब्रा बाह्यवळणऐवजी मुंब्रा शहरातील अंतर्गत रस्त्यातून शिळफाटा, नवी मुंबईच्या दिशेने प्रवेश करता येईल. तर अवजड वाहनांना पर्यायी मार्गांवरून वाहतूक करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

हेही वाचा – एच३एन२चा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे पालिकेकडून उपाययोजना, खासगी डॉक्टरांचा बनवला WhatsApp ग्रुप

मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रेतीबंदर पुलाकडील भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी आज रात्री उशिरा वाहनांची वाहतूक कमी झाल्यानंतर बाह्यवळण मार्ग पूर्णपणे बंद केला जाणार आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून उरण जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक गुजरात, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने होत असते. तसेच ठाणे शहरातूनही हजारो वाहन चालक कामानिमित्ताने नवी मुंबईत वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात. हा मार्ग बंद झाल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांची वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्ग, कशेळी- काल्हेर, भिवंडी शहरातून वळविली आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई, कल्याण शहरात कोंडीची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra bypass closed from tonight ssb
First published on: 01-04-2023 at 11:34 IST