scorecardresearch

बाळकुम भागातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

बाळकुम येथील दादलानी भागातील अशोक नगरमधील भूखंडावर उभारलेली पत्रा शेड काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात केली.

thane balkum action
संग्रहित छायाचित्र

ठाणे : बाळकुम येथील दादलानी भागातील अशोक नगरमधील भूखंडावर उभारलेली पत्रा शेड काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात केली. तसेच बाळकुम नाका येथील रस्त्यालगतच्या हातगाड्या तसेच गॅरेजचे शेड जेसीबी मशीनने तोडल्या आहेत.

बाळकुम येथील दादलानी भागातील अशोक नगरमधील भूखंडावर अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाली होती. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाहणी करून येथील पत्राशेडची अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या सहाय्याने निष्कासित केली. तसेच येथील प्लॅस्टिक भंगार व काच भंगार जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या भूखंडावर रितेश पाटील व अतिश पाटील यांनी अतिक्रमण केले होते.  तसेच बाळकुम नाका येथील रस्त्यालगतच्या हातगाड्या तसेच गॅरेजचे शेड जेसीबी मशीनने तोडण्यात आले. हि कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील, कार्यालयीन अधीक्षक व अतिक्रमण नियंत्रण पथकाने केली. कापूरबावडी पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2022 at 18:01 IST

संबंधित बातम्या