ठाणे शहरात आजपर्यंत उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका व शौच करणे, थुंकणे, पाळीव प्राण्याद्वारे अस्वच्छता यासाठी १५० ते २०० रुपये दंड वसुल करण्यात येत होता. या दंडाच्या रकमेत महापालिकेने वाढ करण्याचा निर्णय घेऊन ही रक्कम पाचशे ते एक हजार रुपये इतकी केली असून यामुळे ठाण्यात स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणे यापुढे नागरिकांना महागात पडणार आहे. काही ठराविक नागरिक अजूनही स्वच्छतेविषयी आपल्या जबाबदारीचे पालन करताना दिसून येत नसून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अशा व्यक्तींना शिस्त लावण्यासाठी पालिकेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे

हेही वाचा>>>उद्या कल्याण-डोंबिवली बंद; ‘सुषमा अंधारेंना कल्याण-डोंबिवलीत पाय ठेऊन देणार नाही’

pune ca fraud marathi news, pune ca cheated for rupees 3 crores marathi news
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले, सनदी लेखापालाची ‘अशी’ केली कोट्यवधींची फसवणूक
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा
slums in Dharavi
धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?

ठाणे शहरातील स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा व्हावी यासाठी महापालिकेकडून मोहिम स्वरुपात विशेष प्रयत्न केले जात आहेत. परंतु महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतानाच नागरिकांनी जर त्यात योगदान दिले नाही तर शहर स्वच्छ राखणे कठीण होऊ शकते. ठाणे शहरातील अनेक नागरिक हे स्वच्छतेबाबत फार मोठ्या प्रमाणावर सजग असले तरी काही ठराविक नागरिक अजूनही स्वच्छतेविषयी आपल्या जबाबदारीचे पालन करताना दिसून येत नाही. त्यामुळे शहर स्वच्छ राखण्यासाठी अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा अप्रिय निर्णय घेणे आवश्यक ठरते. ठाणे शहरात उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका आणि शौच करणे, थुंकणे, पाळीव प्राण्याद्वारे अस्वच्छता यासाठी दंड आकारण्यात येतो. परंतु शहरात स्वच्छता मोहिम अधिक तीव्र स्वरुपात हाती घेण्यात आली असून यामुळे या दंडाच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा>>>केडीएमटीने डोंबिवली-पनवेल बस फेऱ्या वाढविल्या

संपूर्ण महापालिका क्षेत्रात नियमित स्वच्छता होत असून ही मोहिम व्यापक स्वरुपात सुरू राहणार आहे. यामध्ये शहरे हागणदारी मुक्त करणे व शहराची साफसफाई, कचरा संकलन वाहतुक व विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. या सर्वाचे पालन करत नसलेल्या व्यक्ती आणि संस्थांवर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु या दंडाची रक्कम कमी असल्यामुळे नागरिकांना दंड लावूनही त्याबाबत गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा>>>वारकरी संप्रदायाकडून उद्या ठाणे बंदची हाक; बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि हिंदूत्वादी संघटनांचा बंदला पाठींबा

दंडाच्या रक्कमेत वाढ
रस्त्यांवर घाण करणे किंवा कचरा फेकणाऱ्यांकरिता सध्याची दंडाची रकम १८० रुपये इतकी असून त्यात वाढ करून ही रकम आता ५०० रुपये इतकी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांसाठी सध्याची दंडाची रकम १५० रुपये असून त्यात वाढ करून तो ५०० रुपये करण्यात आला आहे. उघडयावर लघुशंका करण्यांसाठी सध्याची दंडाची रकम २०० रुपये इतकी होती. त्यात वाढ करून ती रकम एक हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. उघडयावर शौच करण्यासाठी सध्याची दंडाची पाचशे रुपये असून त्यात वाढ करून ती एक हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता केल्यास सध्याची दंडाची रकम १८० रुपये असून ही रकम आता एक हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तणूक करणे अपेक्षित असते. स्वच्छतेमध्ये ठाणे शहरात आजपर्यंत जे सकारात्मक काम झाले, ते शहरवासीयांच्या सहभागामुळेच होवू शकते. मात्र जे नागरिक आपल्या कृतीमधून या उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई करणे आवश्यक ठरते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.-अभिजीत बांगर,आयुक्त, ठाणे महापालिका