शहरातील वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरणारे आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून शहरात सुरू असलेल्या बाजारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सोमवारी खारेगांव, मंगळवारी ढोकाळी, बुधवारी लोकमान्यनगर, गुरुवारी कासारवडवली, शुक्रवारी पातलीपाडा आणि शनिवारी मनोरमानगर येथे भरणारे आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने आठवडा बाजार बंद करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. त्यानुसार प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अशोक बुरपल्ले, सर्व साहाय्यक आयुक्त यांनी कारवाई सुरू केली आहे.