scorecardresearch

डोंबिवलीत औषध पुरवठादाराचा खून

डोंबिवलीत एका औषध पुरवठादाराचा मुंब्रा येथील एका बिगारी कामागाराने शनिवारी खून केला.

crime

डोंबिवलीत एका औषध पुरवठादाराचा मुंब्रा येथील एका बिगारी कामागाराने शनिवारी खून केला. अंगावर थुंकल्याच्या वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.विजय झण्णालाल पटवा (५२) असे खून झालेल्या औषध पुरवठादाराचे नाव आहे. कैफ जावेद खान (१७) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. शनिवारी औषध पुरवठादार विजय पटवा दुचाकीवरून डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथून जात होते. रस्त्याच्या कडेला उभा असलेला कैफ खान अचानक विजय यांच्या अंगावर थुंकला. विजय यांनी दुचाकी उभी करुन कैफ याला अंगावर थुंकल्याचा जाब विचारला.

हेही वाचा >>>ठाणे: फार तर २८ दिवस जेलमध्ये रहावे लागेल; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा व्यक्त केली अटकेची भीती

बेभान झालेल्या कैफने विजय यांच्यावर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण करत जमिनीवर आदळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुध्दावस्थेत गेले. विजय सोसायटीमध्ये राहणाऱ्या अनिरुध्द म्हात्रे यांच्या समोर हा प्रकार घडला. पादचाऱ्यांनी कैफला बाजुला करण्याचा प्रयत्न केला तो बेभान झाला होता. विजय जमिनीवर कोसळल्यानंतर कैफ पळून गेला. पादचाऱ्यांनी विजय यांना पालिका शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी परिसरात शोध घेऊन आरोपी कैफचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली. अनिरुध्द यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कैफ विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-12-2022 at 22:31 IST