scorecardresearch

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…

दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी सभा हीच खरी हिंदुत्ववादी विचारांची सभा असेल. असेही म्हस्के म्हणाले आहेत.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…

ठाणे : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. सध्या उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली असली तरी तिथे होणारी सभा ही हिंदुत्ववादी विचारांची नसून केवळ टोमणे सभाच होणार आहे. असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महपौर नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तर दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी सभा हीच खरी हिंदुत्ववादी विचारांची सभा असेल. असेही म्हस्के यावेळी म्हणाले. ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रौत्सवाची माहितीची देण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या वतीने टेंभी नाका येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

हिंदुत्ववादी विचारसरणीचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत युती करून उध्द्वव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सभेत कोणतेही हिंदुत्ववादी विचार नसणार. तेथे केवळ टोमणे सभाच होणार आहे. तर दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी सभा हाच खरा दसरा मेळावा आणि खरी हिंदुत्ववादी विचारांची सभा असेल. असा टोला नरेश म्हस्के यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यासर्वांची गर्दी शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला देखील शिंदे यांच्या सभेलाच गर्दी दिसेल. असेही म्हस्के यावेळी म्हणाले. तसेच यावेळी टेंभी नाका येथील नवरात्रौउत्सवात शिखर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कलादिग्दर्शक अमन विधाटे यांनी हा देखावा साकारल्याची माहिती म्हस्के यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : दसरा मेळाव्यासंदर्भात शिंदे गट महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत; सुहास कांदे यांनी दिली माहिती, म्हणाले…

सणांवरील निर्बंध हटविले – खा. श्रीकांत शिंदे

आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या या नवरात्रौत्सवाला देशभरातून नागरिक भेट देत असतात. हीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे. मागील सरकारच्या काळात सणोत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र सध्याच्या सरकारने हे सर्व निर्बंध हटविले आहेत. लोकांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. याचा प्रत्यय दहीहंडी आणि गणेशोत्सवात आला. यामुळे नवरात्रोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. तसेच टेंभी नाका येथे आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रोउत्सवा दरम्यान नऊ दिवस महिलासांठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

देवीच्या मिरवणुकीला मुख्यमंत्र्यांची हजेरी

घटस्थापनेच्या दिवशी देवी आगमनाच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या