मुदतवाढीअभावी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बंद

ठाणे जिल्ह्यात बालकामगारांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प गेल्या आठ महिन्यापासून खंडित झाला आहे.

बालकामगारांना शिक्षण प्रवाहात आणणाऱ्या योजनेला खीळ

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात बालकामगारांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प गेल्या आठ महिन्यापासून खंडित झाला आहे. या प्रकल्पाची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपली असून पुन्हा केंद्र शासनाकडून मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प बंद झाला असल्याची माहिती ठाणे जिल्हा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालकांकडून देण्यात आली.

भिवंडी, मुंब्रा आणि मीरा-भाईंदर या भागात बालकामगार आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्वेक्षणात जिल्ह्यात २००५ पासून ते आतापर्यंत  ८ हजार ९८ बालकामगार आढळून आले आहेत. त्यापैकी ५ हजार ९६ मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून इतर मुलांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या प्रकल्पाची दोन वर्षांची मुदत असते. दोन वर्षांनंतर पुन्हा केंद्राकडून या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात येते. २०१९ साली सुरू झालेल्या प्रकल्पाची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपली असतानाही अद्याप  केंद्र शासनाकडून  मुदतवाढ मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून सुरू असलेला प्रकल्प खंडित झाला आहे. केंद्र शासनाकडून परवानगी मिळाल्यास जिल्ह्यातील बालकामगरांचे सर्वेक्षण करण्यात येईल असे ठाणे जिल्हा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालक विभागाकडून सांगण्यात आले.

प्रकल्प काय?

या प्रकल्पांतर्गत बालकामगार मुलांचे सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणात एका भागात जर १५ ते २० बालकामगार आढळून आल्यास त्यांच्यासाठी त्या भागात प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येतात. या केंद्रांत मुलांना एक वर्ष प्राथमिक शिक्षण दिले जाते. नंतर काही मुलांच्या कुटुंबांशी संपर्क झाल्यास त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. अन्य मुलांना शिक्षणासाठी शाळेत दाखल करण्यात येते. २००५ पासून आतापर्यंत ५ हजार ९६ मुलांना अशा प्रकारे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे. 

ठाणे जिल्ह्यात गेल्या २००५ पासून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सुरू आहे. २०१९ ला सुरू करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या प्रकल्पाची मुदत जानेवारी २०२१ ला संपली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने मुदतवाढ न दिल्यामुळे हा प्रकल्प सध्या बंद आह

प्रियांका चाळक, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, ठाणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: National child labor project extension ysh

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या