ठाणे – राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणानुसार ५६४ पाणथळींबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी पाणथळ भूमीदिनानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत ‘भविष्यासाठी पाणथळभूमींचे संरक्षण’ या संकल्पनेवर आधारित विविध व्याख्याने तसेच चर्चासत्र पार पडणार आहेत. त्याचप्रमाणे यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा देखिल सहभाग असणार आहे.

देशभरातील २.३१ लाख पाणथळ जागा संरक्षित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने सर्व राज्य प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ५६४ पाणथळींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर पाणथळ संरक्षणासाठी स्वच्छ खाडी अभियान अंतर्गत पर्यावरण दक्षता मंडळ, एनव्हायरो विजिल, महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान, मुंबई विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषदेचे आयोजव करण्यात आले आहे. पाणथळभूमी दिनानिमित्त दरवर्षी ही परिषद होत असते. यंदाची परिषद ‘भविष्यासाठी पाणथळींचे संरक्षण’ या विषयावर असणार आहे. यावेळी वेटलैड्स इंटरनॅशनल साउथ एशियाचे डायरेक्टर डाॅ. रितेश कुमार यांचे व्याख्यान असणार आहे. तसेच यावेळी महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने खारफुटी परिसंस्था आणि जैवविविधता संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच देशातील विविध पाणथळभूमीवर चालु असलेले शोधकार्य, अभियान, चळवळी आणि संवर्धनात्मक प्रयत्न याविषयी चर्चा होणार आहे. ही परिषद शनिवार, १ फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये असणार आहे.

rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Guidance for 10th-12th students State Board appoints counsellors
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
How To Prepare for UPSC Prelims 2025
UPSC Prelims 2025 : यूपीएससी प्रिलिम्सची तयारी करताय? मग अभ्यासाच्या ‘या’ टिप्स एकदा नक्की वाचा
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश

हेही वाचा >>>मुंबई नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे ६४ टक्के काम पूर्ण; मे अखेरीस पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीपुढे आव्हान

पाणथळ संवर्धनासाठी पथनाट्य

ठाणे जिल्ह्यातील एकूण १४ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले होते. पाणथळ संवर्धन आणि पाणथळींवर अवलंबून असणारी जीवसृष्टी या विषयावर हे पथनाट्य सादक झाले होते. यातील एक पथनाट्याचे सादरीकरण परिषदेच्यावेळी करण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाणथळभूमी संवर्धनामध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पाणथळभूमी छायाचित्रण स्पर्धा, लघुचित्रफित स्पर्धा, फलक तयार करणे स्पर्धा घेण्यात आल्या. यातील अनेक फलक आणि शोधनिबंधांचे परिषदेच्यावेळी सादरीकरण केले जाणार आहे.

Story img Loader