Premium

ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती

महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो या विद्यार्थ्याने नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग, अशा शीर्षकाच्या अंतर्गत शोधनिबंध सादर केला होता.

National level selection
ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे – महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो या विद्यार्थ्याने नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग, अशा शीर्षकाच्या अंतर्गत शोधनिबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्याला पाठ्यवृत्ती मिळाली असून देशभरातील १० सर्वोच्च शोधनिबंधांमध्ये त्याची निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय पातळीवर इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इंडियन कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स या बालरोग शास्त्राच्या सर्वोच्च संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयएपी – आयसीपी संशोधन पाठ्यवृत्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून विद्यार्थ्यांनी सुमारे ७०० हून अधिक शोधनिबंध सादर केले होते. त्यातून अतिशय उच्च पातळी असलेल्या निवड चाचणीतून अंतिम १० शोधनिबंध संशोधन पाठ्यवृत्तीसाठी निवडले जातात. त्यात, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो या विद्यार्थ्याच्या शोध निबंधाची निवड झाली आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त

नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग यावर त्याने शोधनिबंध सादर केला होता. या शोधनिबंधासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहीत रोजेकर यांच्यासह विद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वाती घांघुर्डे, डॉ. सुनील जुनागडे, डॉ. जयेश पानोत, डॉ. जयनारायण सेनापती यांनी शर्विन याला मार्गदर्शन केले.

हेही वाचा – कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक सुरळीत, मालगाडीच्या इंजिन दुरुस्तीचे काम पूर्ण

आविष्कार संशोधनात कामगिरी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेतही राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील वत्सल जैन आणि शिवानी निरगुडकर या विद्यार्थ्यांना मेडिसीन आणि फार्मसी या गटात अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National level selection of research in medical college in thane ssb

First published on: 26-09-2023 at 19:02 IST
Next Story
कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक सुरळीत, मालगाडीच्या इंजिन दुरुस्तीचे काम पूर्ण