India vs SA Womens Final : महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज, रविवारी दुपारी ३ वाजता नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम वर भारतीय महिला संघ विरुद्ध साऊथ आफ्रिका महिला संघ असा अंतिम सामना रंगणार आहे. महिलांच्या एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी सकाळपासूनच स्टेडियम परिसरात गर्दी केली आहे. अनेकांना हा सामना प्रत्यक्ष पाहायचे आहे. परंतु, सामन्याची तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय महिला संघाने यापूर्वी २००५ आणि २०१७ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. परंतु, त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. परंतु, महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता, भारतीय महिला संघ विरुद्ध साऊथ आफ्रिका महिला संघ असा अंतिम सामना आज, रविवारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम वर रंगणार आहे.
भारतीय महिला संघ यंदा प्रथमच महिला विश्वचषक जिंकेल अशी आशा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. या सामन्यासाठी स्टेडियम बाहेर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, चाहत्यांनी रविवारी सकाळ पासून स्टेडियम बाहेर गर्दी केली आहे. अनेकांना हा सामना प्रत्यक्ष पाहता यावा यासाठी सामन्याच्या एक ते दोन दिवस अगोदर पासून ऑनलाईन तिकीट मिळतेय का याचा प्रयत्न करत आहेत. तर, अनेकांनी एक दोन दिवस अगोदर पासून स्टेडियमच्या तिकीट खिडकी बाहेर रांगा लावल्या होत्या. परंतू, त्यांनाही या सामन्याच्या तिकीट मिळू शकलेल्या नाही. यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
