वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या | Navratri festival arches collapsed in Kalyan due to stormy winds amy 95 | Loksatta

वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या

सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती.

वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या
वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या

कल्याण शहर परिसरात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटात पडलेल्या मुसळधार पावसात रस्त्यावरील नवरात्रोत्सव शुभेच्छांच्या कमानी रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक पोलीस, स्थानिक रहिवाशांनी हस्तक्षेप करुन या कमानी भर पावसात बाजुला करण्याचे काम केले. काही वाहनांना या कमानी कोसळल्या पण वाहनांचे फार नुकसान झाले. एका चारचाकी मोटार, एका ट्रकच्या बाजुला या कमानी कोसळल्या पण या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले नाही, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी

दुपारी एक वाजता अचानक वादळी वारे सुरू झाले. त्या बरोबर पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यांवरील कमानी धडाधड रस्त्यांवर परिसरातील सोसायट्यांच्या आवारात कोसळल्या. पाऊस असल्याने कोणीही रस्त्यावर नसल्याने कमानी कोसळल्याने मुळे कोणाला इजा झाली नाही. कल्याण पूर्व, डोंबिवलीतही अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. रस्त्यावरुन कमानी काढून टाकल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी

संबंधित बातम्या

कळवा रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली
खड्डय़ांवरून दिवावासी आक्रमक
आठ अधिकाऱ्यांच्या अडचणींत वाढ
एक्स्प्रेस थांबा अशक्य
शहरबात मीरा-भाईंदर : कचराप्रश्नी नागरिकांत जनजागृती गरजेची!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द