देवी विसर्जन मिरवणूकांनिमित्ताने कळवा, भिवंडी शहरात ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. कळवा आणि भिवंडी येथील विसर्जन घाट परिसरात हे बदल लागू असतील. अशी माहिती पोलिसांनी दिली. या वाहतूक बदलामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

असे आहेत वाहतूक बदल

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी
heavy goods vehicles ban on Ghodbunder road for six month
घोडबंदरकरांची अवजड वाहतूकीच्या कोंडीतून सुटका? पुल कामासाठी अतिअवजड मालवाहू वाहनांना बंदी

हेही वाचा >>> उल्हासनगर : शहाड पुलावरची कोंडी फुटणार ; एमएमआरडीएकडून पुलाच्या विस्तारीकरणाला तत्वतः मंजूरी

नवी मुंबई बेलापूर मार्गे तसेच ऐरोली- पटणी मार्गे विटावा जकात नाका, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या टीएमटी,एनएमएमटी, एसटी आणि खाजगी बसगाड्यांना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. येथील वाहने विटावा जकात नाका येथे प्रवासी उतरवतील.

मुंब्रा येथून पारसिक नाका मार्गे खारेगाव टोल नाका, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या टीएमटी आणि खाजगी बसगाड्यांना पारसिक चौक येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने पारसिक चौक येथे प्रवासी उतरवून तेथूनच प्रवासी घेवून परत मुंब्रा येथे जातील. हे वाहतूक बदल बुधवारी दुपारी २ ते मिरवणूका संपेपर्यंत कायम राहतील.

भिवंडी येथील वाहतूक बदल –

भिवंडी येथील कारीवली, हनुमान मंदिर जवळ विटभट्टी, सुतारआळी नाका या भागातून मंडई कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सुतारआळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने सुतारआळी, इदगाहरोड मार्गाने इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>>ठाण्यात शक्तिप्रदर्शन करत शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार

कॉटरगेट जकात नाका येथुन मंडई, बाजारपेठ व तिनबत्ती कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना हनुमानबावडी मिरॅकल मॉल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने कॉटरगेट मस्जिद येथुन जैतुनपुरा भिवंडी शहर पोलीस ठाणे येथून इच्छित स्थळी जातील.

धामणकर नाका येथून जुने ठाणे रोडने मंडईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना केशरबाग नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने केशरबाग नाका येथून उजवीकडे वळून कुंभारआळी मार्गे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान विश्वस्तपदासाठी रविवारी निवडणूक; चार नवीन चेहऱ्यांना संधी

टीएमटी., एसटी बसगाड्या आणि हलक्या वाहनांना नारपोली पोलीस ठाणे येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. टीएमटी, एसटी बसगाड्यातील प्रवाशांना नारपोली पोलीस ठाणे येथे उतरविले जाईल. हलकी वाहने देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील.

रांजनोली नाका येथे हलक्या वाहनांना प्रोशबंदी आहे. ही रांजनोली नाका येथून वळसा घेवून मुंबई- नाशिक बाह्यवळण मार्गावरून अंजूरफाटा किंवा वसई रोडने जातील. तर, बसगाड्यांतील प्रवासी रांजनोली नाका येथे उतरून जातील. येथील बदल सकाळी ६ ते रात्री मिरवणूका संपेपर्यंत कायम राहतील.