scorecardresearch

Premium

कसबा निवडणूक हरल्यामुळे ब्राह्मण भोजन सुचले का ? राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल

श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सहस्त्र ब्राह्मण भोजन कार्यक्रम आयोजित केला असून या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल केला आहे.

jitendra awhad
कसबा निवडणूक हरल्यामुळे ब्राह्मण भोजन सुचले का ? राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

ठाणे : श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सहस्त्र ब्राह्मण भोजन कार्यक्रम आयोजित केला असून या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल केला आहे. हा छान उपक्रम असल्याचे सांगत कसबा निवडणूक हरल्यामुळे ब्राह्मण भोजन सुचले का, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सहस्त्र ब्राह्मण भोजन कार्यक्रम रविवारी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा फलक समाजमाध्यमांवर पोस्ट करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल केले आहेत. फारच छान उपक्रम १ हजार ब्राह्मणांना दगडू शेठ ट्रस्टने भोजन दिले. गणपतीचे दर्शन सगळेच जात समूह घेत असतात, आदर्श घाला नवीन. क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांनाही भोजन द्या. ५ हजार वर्षा पूर्वीच्या परंपरा मोडीत काढल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. कसबा निवडणूक हरल्यामुळे हे ब्राह्मण भोजन सुचले नाही ना, असा प्रशही त्यांनी विचारला आहे.

Devendra Fadnavis and Supriya Sule
“भाजपा देवेंद्र फडणवीसांवर अन्याय करत आहे, याच्या वेदना…”, सुप्रिया सुळेंचं विधान
Dhananjay-Munde-13
पीक विमा भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे
Uddhav Thackeray SHarad Pawar Praful Patel
“राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलेलं; पण…”, प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट, म्हणाले…
union minister kumar mishra in satara for bjp contact campaign remark on ajit pawar
Video : अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे भाजपला काही फरक पडत नाही-अजय कुमार मिश्रा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader jitendra awad question regarding kasba election thane amy

First published on: 24-09-2023 at 15:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×