ठाणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून त्यात मुंब्य्रातील एक प्रभाग कमी करून दिवा भागात प्रभागांची संख्या वाढविण्यात आली आहे. दिव्यात प्रभाग संख्येत वाढ व्हावी यासाठी शिवसेना, तर मुंब्र्यात प्रभाग संख्येत वाढ व्हावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती. असे असतानाच अंतिम रचनेत दिव्यात नगरसेवकांची संख्या सातऐवजी नऊ, तर मुंब्य्रात नगरसेवकांची संख्या २७ वरून २५ करण्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेत सद्य:स्थितीत नगरसेवकांची संख्या १३१ आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या संख्येत ११ ने वाढ करण्यात आली असून यामुळे नगरसेवक संख्या १४२ इतकी झाली आहे. ही निवडणूक तीन सदस्य पद्धतीने होणार असल्याने प्रभागांची संख्या ४७ इतकी आहे. यातील एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. तर उर्वरित प्रभाग तीन सदस्यांचे असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. त्यात दिव्यातील नगरसेवक संख्या कमी करून मुंब्र्यात नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली होती. दिव्यात यापूर्वी आठ नगरसेवक होते. प्रारूप रचनेत नगरसेवक संख्या सात झाली होती. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप- प्रत्यारोपाची लढाई रंगली होती. या प्रभाग रचनेविरोधात शिवसेनेने हरकती नोंदविल्या होत्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp pushed thane final ward formation increased corporators diva less corporators mumbraysh
First published on: 15-05-2022 at 00:55 IST