ठाण्यासाठी नवीन पोलीस ठाणे

ठाण्यात घोडबंदर मार्गावर होणारा नागरीकरणाचा वाढता विस्तार आणि त्यामुळे पोलिसांवर पडणारा ताण ..

ठाण्यात घोडबंदर मार्गावर होणारा नागरीकरणाचा वाढता विस्तार आणि त्यामुळे पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन चितळसर-मानपाडा येथे नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला असून अशाच प्रकारे दिवा आणि कल्याणमधील खडकपाडा येथेही नवीन पोलीस ठाणे स्थापण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाढत्या नागरिकरणामुळे कासारवडवली पोलीस ठाण्यावर भार पडत असल्याने घोडबंदर भागासाठी नव्या पोलीस ठाण्यासाठी मागणी केली जात होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New police station in thane

ताज्या बातम्या