शहरात कोरोनाआणि ‘एच ३ एन २’ आजारांबरोबरच स्वाईन फ्ल्युचा शिरकाव

ठाणे शहरात कोरोना आणि ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच आतापर्यंत तीन जणांचा मृत्यु झालेला असतानाच, शहरात कोरोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ चे नऊ रुग्ण आढळून आल्याची बाब जनुकिय क्रमनिर्धारण चाचणी अहवालातून पुढे आली आहे. यामुळे शहराच्या आरोग्य चिंतेत वाढ झालेली असून त्यातच शहरात स्वाईन फ्ल्युच्या आजारानेही डोके वर काढल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरात शहरात स्वाईन फ्ल्युचे ५७ रुग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य यंत्रणाची झोप उडाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाण्यातील खचलेला रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला सुरुवात;दुरुस्ती होईपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली

ठाणे शहरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दररोज पाचशेच्या आत कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. या चाचण्यांच्या संख्येत वाढ पालिकेने वाढ केली असून आता दररोज दोन हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. शहरात आतापर्यंत ४४७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सद्यस्थितीत २४६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी २२१ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १४ रुग्ण तर, खासगी रुग्णालयात ११ रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज ५० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचेही रुग्ण शहरात आढळून येत असून या आजाराचे २४ रुग्ण मार्च महिन्यात आढळून आले आहेत. असे असतानाच, शहरात करोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ चा शिरकाव झाल्याचे समोर आले असून या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळून आल्याची जनुकिय क्रमनिर्धारण चाचणी अहवालातून पुढे आली आहे. तसेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत २१९ स्वाईन फ्ल्युचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ५७ रुग्ण हे मार्च महिन्यात आढळून आलेले आहेत. या तिन्ही आजारांच्या वाढत्या संसर्गामुळे शहराची आरोग्य चिंता वाढली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत मनसेचा फेरीवाले आणि पालिकेला इशारा; ‘आता आमच्याकडे दुर्लक्ष करा’

ठाणे महापालिकेने मार्च महिन्यात आढळून आलेल्या ३२ रुग्णांचे नमुने पुणे येथे जनुकिय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ९ रुग्णांना करोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ ची लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. यातील दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते तर, उर्वरित सात रुग्ण घरीच उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण बरे झालेले आहेत. उर्वरित २३ रुग्णांच्या चाचणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine patients of corona new subtype were found in thane city amy
First published on: 28-03-2023 at 19:42 IST