ठाणे : घोडबंदर येथील हिरानंदानी ईस्टेट भागात रविवारी नविन इमारतीच्या बांधकामादरम्यान महानगर कंपनीची घरगुती गॅस पुरवठा करणारी वाहिनी फुटली. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांचा गॅस पुरवठा तीन ते चार तास खंडित झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, केवळ अर्धा तासच गॅस पुरवठा खंडित झाला होता असा दावा महानगर कंपनीकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरानंदनी ईस्टेट भागात रविवारी दुपारी नविन इमारतीचे बांधकाम सुरु होते. या कामामुळे महानगर कंपनीची घरगुती गॅस पुरवठा करणारी १२५ मिमी व्यासाची वाहिनी फुटली. या घटनेची माहिती मिळताच महानगर कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. गॅस फुटल्याचा फटका सुमारे १२०० ग्राहकांना बसला होता. तीन ते चार तास घरगुती गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले होते. ऐन सुट्टीच्या दिवशी गॅस सेवा बंद झाल्यामुळे महिला वर्गाचाही गोंधळ उडाला होता. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गॅस पुरवठा सुरू झाला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No gas supply in hiranandani estate due to pipeline break zws
First published on: 16-05-2022 at 04:07 IST