ठाणे महापालिकेच्या नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील कन्हैयानगर भागातील जलकुंभाच्या बाह्य जलवाहिनीचा नादुरुस्त झालेला वॉल बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे या भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
कोपरी परिसरचा पाणी पुरवठा शुक्रवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते शनिवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ९ असा २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कन्हैयानगर जलकुंभांतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरूदेव सोसायटी, कृष्णानगर तसेच स्वामी समर्थ मठ परिसर येतो. या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.