राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ओबीसी जनजागरण अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात ठाणे शहरातून होणार असून येत्या रविवारी, १३ फेब्रुवारीला ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आणि समता परिषदेचे बापू भुजबळ हे  उपस्थिताना संबोधित करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

केंद्र सरकारच्या धोरणामुळे इम्पिरिकल डाटाचा घोळ निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजघटकांच्या राजकीय आरक्षणावर झाला आहे. त्याबाबत ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर ओबीसी परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. ओबीसींना आरक्षण हवे असल्यास त्यांनी संघर्ष करणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यातील ओबीसी जातसमूहातील ३५४ पैकी १७८ जातसमूहांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

शिक्षण-नोकरी आणि राजकीय आरक्षणाबाबत या परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, ओबीसी जात समूहांचे प्रश्न जाणून घेऊन त्या दृष्टीने राज्यभर आंदोलन उभारण्याची पायाभरणी करण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. राज्यभरातील सुमारे ५०० ओबीसी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत,  असे राज राजापूरकर यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील सर्व ओबीसी जात समूहांच्या प्रतिनिधींनी ओबीसी परिषदेमध्ये उपस्थिती दर्शवून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले आहे.