नालासोपारा आणि विरारमध्ये अनधिकृत इमारतींची उभारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नालासोपारा आणि विरारमधील ११ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व शहरातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी बांधलेल्या इमारतीमध्ये रहिवासी राहत आहेत.

वसई-विरार शहरात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. बोगस बांधकाम परवाना घेऊन इमारतीे बांधल्या जात आहेत. अनेक प्रतिष्ठित बिल्डरदेखील अशाप्रकारे बांधकाम करून इमारती उभारत असल्याचे समोर आले आहे. सहाय्यक आयुक्त प्रेमसिंह जाधव यांनी विरार पोलीस ठाण्यात दोन प्रकरणात तक्रार दिल्यानंतर ११ बांधकाम व्यावसायिकांवर एमआरटीपीए अ‍ॅक्ट तसेच फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बिल्डरांनी पालिकेचीे परवानगीे न घेता तसेच बनावट सीसी बनवून इमारतीे बांधल्या असल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी आणखी एका मोठय़ा बिल्डरावर गुन्हे दाखल करण्याचीे प्रक्रिया सुरू असल्याचीे माहितीे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंह जाधव यांनी दिलीे. यामुळे या इमारतीेंत राहणाऱ्या लोकांच्या भवितव्यावर टांगतीे तलवार निर्माण झालीे आहे.

तीन प्रकरणे

  • पहिले प्रकरण विरारच्या मनवेल पाडा येथीेल आहे. सव्‍‌र्हे क्रमांक २१९ मधील हिस्सा नंबर ३ वर तुलसी हाईट्स आणि मर्सी हाईट्स या इमारतीे बांधण्यात आल्या होत्या. या इमारती सात ते आठ वर्षे जुन्या होत्या. मात्र त्यांनी बोगस सीसी (बांधकाम परवाना ) वापरून फसवणूक केलीे होतीे. त्यामुळे अविनाश वर्तक आणि त्यांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश वर्तक यांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
  • दुसऱ्या प्रकरणात विरारच्या सव्‍‌र्हे क्रमांक १४६ मधील हिस्सा क्रमांक २ वर जानकी अपार्टमेंट बांधणाऱ्या जयेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
  • नालासोपारा विजय नगर येथे सव्‍‌र्हे क्रमांक १६ मध्ये इमारत बांधणाऱ्या युनिव्हर्सल ग्रुपच्या रवीे मुकुंद आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offence against 11 builders in vasai
First published on: 16-07-2016 at 01:57 IST