पाचपाखाडी येथील चंदनवाडी भागात शुक्रवारी इमारतीच्याउद्वाहकाखाली अडकून नारायण बेलोसे या वृद्धाचा मृत्यू झाला.त्यांचा मृतदेह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिसांनी उद्वाहकाखालील जागेतूनबाहेर काढला आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यातकरण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशीरापासून ते घरी आले नव्हते. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
चंदनवाडी येथील रायगड आळीमध्ये एका इमारतीत नारायण बेलोसेहे राहत होते. बुधवारी रात्री या परिसरात लग्न समारंभ होता. या सोहळ्यास ते गेले होते. परंतु ते घरी परतले नव्हते. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची नोंद त्यांच्या कटुबियांनी केली होती. शुक्रवारी सायंकाळी७ वाजेच्या सुमारास ते इमारतीच्या उद्वाहकाखाली आढळून आले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. रहिवाशांनी याची माहिती नौपाडापोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक, ठाणे महापालिकेचे आपत्तीव्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी दोरीच्या साहाय्याने बेलोसे यांचा मृतदेह बाहेर काढला.याप्रकरणाची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. लग्न सोहळ्यातून ते घरी परतत असताना उद्वाहकाखालील जागेत अडकले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.