ठाणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तवेतन (पेन्शन) योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून संप पुकारला आहे. या संपात ठाणे जिल्ह्यातून सुमारे २० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचे ठाणे जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

छत्तीसगढ, राजस्थान, पंजाब, हिमाचलप्रदेश अशा राज्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना स्वीकारली आहे. त्यामुळे राज्यातही ती योजना स्वीकारण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातूनही सुमारे २० हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या मागणीसोबतच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करा, सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा, कंत्राटी कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करावी, निवृत्तीचे वय ६० करावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सध्या रोखलेली पदोन्नती तत्काळ सुरू करावी, उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतन वाढीसाठी येण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरू करावे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करावे, अशा विविध मागण्या संपकऱ्यांच्या आहेत.

sushma andhare
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; सुषमा अंधारे
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर
Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी
What did Pune get in the state budget for the year 2024-25
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर

हेही वाचा – उपराजधानीसह विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज, शेतकरी चिंतेत

आयुष्यभर सरकारची सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर वृद्धापकाळातील सामाजिक सुरक्षिततेसाठी आवश्यक जुनी पेन्शन योजनेबाबत आम्ही आग्रही असून सरकारने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच यायबत सकारात्मक घोषणा करावी, असे ठाणे जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूरच्या जंगलात आढळला औषधीयुक्त गुणांचा अतिशय दुर्मिळ पिवळा पळस

‘इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करावी, तसेच बक्षी समितीच्या अहवालानुसार शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, शिक्षक संवर्गाला आश्वासित प्रगती योजना लागू करावी, या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा संपात सक्रिय सहभागी होईल’, असे शिक्षक सेना ठाणेचे सरचिटणीस प्रमोद पाटोळे म्हणाले.