भिवंडीत घराचे बांधकाम कोसळून एकाचा मृत्यू; सहा जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ठाणे : भिवंडी येथील आजमीनगर भागात शुक्रवारी सकाळी एकमजली घराचा सज्जा आणि भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या प्रकरणाची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रज्जाक अन्सारी (४०) असे मृताचे नाव आहे. तर मोहम्मद हसीम (३५), सुबेदा खातून (५५), अमिना अन्सारी (४५), रोशन बानो (३०), झोरा अब्दुल खान (१२) आणि रुसी फातिमा (१४) अशी जखमींची नावे आहेत. आजमीनगर येथील दिवानशाह दर्गा परिसरात  हे घर आहे. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही दुर्घटना झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One dies after house collapse in bhiwandi akp

ताज्या बातम्या