लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत कोपर रेल्वे स्थानक हद्दीतील सिध्दार्थनगरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या एका ३५ वर्षाच्या इसमाला पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. या इसमाकडून ८१ हजार रूपये किमतीचा तीन हजार २०७ ग्रॅम वजनाचा गांजा पथकाने जप्त केला.

pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Three arrested in mephedrone production case in Vita
विट्यातील मेफेड्रोन उत्पादन प्रकरणी तिघांना अटक
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
Eleven people including two lawyers arrested for granting bail to criminals in jail by presenting fake guarantors Pune news
बनावट जामीनदार हजर करुन कारागृहातील गुन्हेगारांना जामीन; दोन वकिलांसाह ११ जणांना अटक
mhalunge police arrested house robber seizing 26 jewelry pieces worth ₹18 lakh
घरफोडीतील आरोपी टी-शर्टच्या आधारे ओळखून पकडला
Drug dealer, Katraj, Drug , Charas,
कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, एक लाखांचे चरस जप्त
Kalyan Dombivli police drug smuggling case arrest
कल्याण-डोंबिवलीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना अटक

लीलाधर सुरेश ठकार (रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी, कोपर क्राॅस रोड, हनुमान मंदिर शेजारी, कोपर, डोंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेत कोपर हद्दीतील सिध्दार्थनगर भागात एक इसम अंमली पदार्थ विकण्यास बसला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नियंत्रणाखालील विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

आणखी वाचा-शिळफाटा मार्गावर भीषण अपघात; रिक्षा चालक गंभीर जखमी

या पथकाने सिध्दार्थनगर भागात हनुमान मंदिर शेजारी सापळा लावून लीलाधर ठकार यांना अटक केली. त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. जुनी डोंबिवली, कोपर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा भागात काही इसम अनेक वर्षापासून किरकोळ पध्दतीने एम. डी. पावडर, गांजाची तस्करी करत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. ही तस्करी ठाणे ते कर्जत पट्ट्यात अधिक प्रमाणात चालते अशी चर्चा आहे.

डोंबिवली जुगार अड्डा बंद

डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे सत्यवान चौकात गुन्हेगार पार्श्वभूमीचे काही भाई जुगार अड्डा चालवित होते. या भाईंची स्थानिक भागात दहशत असल्याने कोणीही स्थानिक नागरिक याविषयी तक्रार किंवा उघडपणे बोलत नव्हते. या जुगार अड्ड्यांच्या ठिकाणी जुगार खेळणारे इसम त्यांची वाहने रस्त्यावर उभी करत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता. यामधील काही इसम हे तडीपार होऊन आलेले होते. त्यामुळे आपण कोणाला घाबरत नाही, असा या भाईंचा तोरा होता.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनरचा अपघात

सत्यवान चौकातील जुगार अड्डा,देवीचापाडा जेट्टी येथील गांजा अड्डा याविषयीच्या तक्रारींच्या अनुषंगाने लोकसत्ताने वृत्त प्रसिध्द केले. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. स्थानिक विष्णुनगर पोलीस, विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई होण्यापूर्वी जुगार अड्ड्यावरून भाई गायब झाले. डोंबिवलीत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा जेट्टी, कलावती आई मंदिर परिसर, गोपीनाथ चौक, कुंभारखाणपाडा, गणेशनगर गणेशघाट, नवापाडा, रेल्वे मैदान भागात गस्त भागात विशेष पोलिसांची गस्त वाढल्याने अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची कोंडी झाली आहे.

महाराष्ट्रनगरमध्ये गोपीनाथ चौकाजवळील धवनी इमारतीच्या समोरील भागात एक कचरा टाकण्याची जागा आहे. या भागातील एका पडिक इमारतीच्या जागेत रात्रीच्या वेळेत काही गांजा तस्कर पडदे लावून बसत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रात्रभर ते या भागात धिंगाणा घालतात, असे रहिवासी सांगतात.

Story img Loader