scorecardresearch

ठाणे : गावठी कट्टे घेऊन आलेल्या एकाला अटक

पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

ठाणे : गावठी कट्टे घेऊन आलेल्या एकाला अटक
गावठी कट्टे घेऊन आलेल्या एकाला अटक

घोडबंदर येथील वाघबीळ भागात शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या विकी कुमार (२८) याला रविवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली महापालिकेतील सावळागोंधळ आणि भाजपला चटके

वाघबीळ नाका येथील बस थांब्यावर एक जण गावठी कट्टे घेऊन येणार असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकी कुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या