५६ रु. नव्हे, ५ रु. ६२ पैसे

बुधवार १३ मे रोजी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये आलेल्या ‘वीजबिलाचा ऑनलाईन भरणा महाग!’ डेबिट-क्रेडिट कार्डावरून व्यवहार करणाऱ्यांना एक टक्का अधिभार, १२.३६ टक्के सेवाकर’ या शिषर्काखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

बुधवार १३ मे रोजी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये आलेल्या ‘वीजबिलाचा ऑनलाईन भरणा महाग!’ डेबिट-क्रेडिट कार्डावरून व्यवहार करणाऱ्यांना एक टक्का अधिभार, १२.३६ टक्के सेवाकर’ या शिषर्काखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. संबंधित बातमीतील १,००० रूपयांचे उदाहरण घेतल्यास अतिरिक्त ५०० रूपयाला १ टक्का दराने ५ रूपये अधिभार आणि त्या ५ रूपयांवर १२.३६ टक्के दराने सेवाकर ६२ पैसे असे एकूण ५ रूपये ६२ पैसे जादाचे भरावे लागतात. त्याऐवजी बातमीत अनवधानाने ५६ रूपये १८ पैसे असे छापण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये तसे कळविले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Online power bill payment