अंबरनाथः शहर नियोजन आणि शहर विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या नगर विकास विभागात पात्र अधिकाऱ्यांची वानवा आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन अ वर्ग नगरपालिकांच्या शहर नियोजनाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून एकाच नगररचनाकारावर सुरू आहे. त्यात त्याच नगररचनाकाराची उल्हासनगरच्या नगररचनाकारपदी प्रभारी नियुक्ती करण्याचा आदेश नुकताच नगर विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या शहरांची जबाबदारी एकाच नगर रचनाकारावर आली आहे.
ठाणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून घर खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे चौथी मुंबई
हेही वाचा… भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक
दोन अ वर्ग नगरपालिका आणि एक महापालिका अशा तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगररचना विभागाचा कारभार एकाच अधिकाऱ्याला देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा रंगली आहे. आधीच ऑनलाईन बांधकाम परवानगीचा घोळ सुरू असताना बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यात आता एकाच अधिकाऱ्याला तिसऱ्या पालिकेचा कार्यभार दिल्याने या विभागांचे कामकाज वेळेत पूर्ण होऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा
तीनही शहरांमध्ये महत्वाचे प्रकल्प
अंबरनाथ शहरात शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, हॉकी क्रीडांगण, जागतिक दर्जाचा तरणतलाव, नाट्यगृहाचा उर्वरित भाग असे अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू आहे. त्यांची कामे नगररचना विभागामार्फत सुरू आहेत. बदलापुरात पूररेषेसह इतर काही प्रकल्प सुरू आहेत. तर उल्हासनगरात पुनर्विकासाच्या कामांना गती मिळण्याची आशा आहे. या तीनही शहरांचे काम येत्या काळात खोळंबण्याची शक्यता आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only one urban planner for 3 cities ambernath badlapur and ulhasnagar asj