ठाणे : यंदा दिवाळी सणापुर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह एक महिन्याचे आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तु व सेवा करापोटी मिळालेले ९५ कोटी आणि इतर रक्कम असे जेमतेम १०० कोटी रुपये शिल्लक आहेत. या रक्कमेतून पुढच्या म्हणजेच डिसेंबर महिन्याचे वेतन देण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तसेच निवडणुक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे. यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के

thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का

ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ५ हजार २५ कोटी रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना पालिकेने कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. याशिवाय, शहर विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागांकडून पालिकेला चांगले उत्पन्न मिळते. यामुळे या विभागांची कर वसुली महत्वाची मानली जाते. मालमत्ता विभागाने ८९३ कोटीपैकी ४२१ कोटींची, अग्निशनम दलाने १०० कोटींपैकी ५० कोटी ५८ लाख, शहर विकास विभागाने ७५० कोटींपैकी ३३० कोटी आणि पाणी पुरवठा विभागाने २२५ कोटींपैकी ४११ कोटी रुपयांची कर वसुली केली आहे. राज्य शासनाकडूनही पालिकेने विविध प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमणात अनुदान मिळालेले आहे. यामुळे करोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी रुळावर येताना दिसून येत होते.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची १६ नोव्हेंबरला सभा

याशिवाय, पालिकेने मार्च २०२३ पर्यंतची ठेकेदारांची देयकेही दिली आहेत. यामुळे पालिकेचे दायित्वही काही प्रमाणात कमी झालेले आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिकेने सानुग्रह अनुदानासह एक महिन्याचे आगाऊ वेतन दिले आहे. ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिली. याशिवाय, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. तसेच स्वच्छता कामांचे देयके, कर्मचाऱ्यांची देणी असे एकूण २३२ कोटी रुपये पालिकेने खर्च केले. यामुळे पालिकेच्या तिजोरीत दिवाळीनंतर ख़डखडाट झाला आहे. पालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तु व सेवा करापोटी मिळालेले ९५ कोटी आणि इतर अशी जेमतेम १०० कोटी रुपये आहेत. वस्तु व सेवा कराच्या रक्कमेतून अधिकारी आणि कमर्चाऱ्यांचे वेतन देण्यात येते. यामुळे ही रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासाठी वापरली जाणार आहे. मालमत्ता कराची दिवसाला ५० लाख ते एक कोटी रुपयांची करवसुली होती. पंरतु निवडणुक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे. यामुळे पालिकेची आवक बंद झाल्याने दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Story img Loader