scorecardresearch

डोंबिवलीत शुक्रवारपासून दहा दिवसांचा पुस्तक अदान प्रदान सोहळा

वाचकाने ५० रुपये किंमतीचे पुस्तक देण्यासाठी आणले असेल आणि त्याला कार्यक्रमस्थळी ५०० रुपये किंमतीचे पुस्तक आवडले तर ते पुस्तक वाचकाला स्वत: जवळील पुस्तक देऊन घेता येणार आहे.

डोंबिवलीत शुक्रवारपासून दहा दिवसांचा पुस्तक अदान प्रदान सोहळा
डोंबिवलीत दहा दिवसांचा पुस्तक अदान प्रदान सोहळा

पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे येथे शुक्रवारपासून दहा दिवसांचा पुस्तक अदान प्रदान सोहळा आयोजित केला आहे. सुमारे दोन लाख पुस्तकांचे अदान प्रदान या सोहळ्यात केले जाणार आहे. दिग्गज साहित्यिक या पुस्तक पंढरीच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे दिली.

हेही वाचा- फेब्रुवारीपासून मानखुर्द-ठाणे प्रवास केवळ पाच मिनिटांत

या सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडासंकुलात हा कार्यक्रम होणार आहे. येत्या शुक्रवारी संध्याकाळी साडे पाचा वाजता ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. उदय निरगुडकर, आ. प्रमोद पाटील, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे.
पुस्तक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराला माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम नगरी नाव देण्यात येणार आहे. पुस्तकांच्या विविध प्रतिकृत कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणार आहेत, असे पै फ्रेन्डस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिका, एम्स रुग्णालयाचे डाॅ. मिलिंद शिरोडकर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य दिले आहे.

हेही वाचा- टिटवाळा रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल जूनमध्ये खुला?, पुलाच्या पोहच रस्ते कामांना प्रारंभ

दहा दिवसाच्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, साहित्यिका अरुणा ढेरे, अशोक कोठावळे, दिनकर गांगल, कलाकार महेश कोठारे, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, वैद्य परीक्षित शेवडे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक काॅफी टेबल पुस्तक प्रसिध्द केले जाणार आहे. विविध मान्यवरांचे ७५ लेख या पुस्तकात आहेत. स्वातंत्र्याची ७५ वर्ष शीर्ष विचार समोर ठेऊन या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. या सोहळ्या निमित्त शहरात ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

हेही वाचा- डोंबिवली पूर्व वाहतूक कोंडीच्या विळख्यात; घरड सर्कल, पी ॲन्ड टी काॅलनी परिसरातील रस्त्यांवर सर्वाधिक कोंडी

आदान प्रदान म्हणजे

घरातील वाचून झालेली किंवा अन्य कोणास देण्याची तयारी करुन ठेवलेली पुस्तके वाचकाने अदान प्रदान कार्यक्रमात आणली तर आणलेल्या त्या पुस्तकांच्या बदल्यात १० रुपये दर आकारुन वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक या कार्यक्रमात घेता येणार आहे. वाचकाने ५० रुपये किंमतीचे पुस्तक देण्यासाठी आणले असेल आणि त्याला कार्यक्रमस्थळी ५०० रुपये किंमतीचे पुस्तक आवडले तर ते पुस्तक वाचकाला स्वत: जवळील पुस्तक देऊन घेता येणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 17:03 IST

संबंधित बातम्या