करोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा नवरात्रोत्सव २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर कालावधीत डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर आयोजित केला आहे. सुमारे एक लाखाहून अधिक नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत, असे शहरप्रमुख राजश मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…

expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार

डोंबिवली शहरात आयोजित केला जाणार भव्य रासरंग कार्यक्रम डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. उपनगरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव म्हणूनही या रास रंग या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. तरुण- तरुणींसह अबाल आणि ज्येष्ठ नागरिकही या उत्सवाची प्रतीक्षा करत असतात. मराठमोळ्या भोंडल्याला गुजराती बांधवांच्या गरब्याचा साज या रासरंग उत्सवाच्या निमित्ताने मिळतो. दरवर्षी एक लाखांहून अधिक जण या उत्सवात हजेरी लावत असतात. खा. शिंदे यांच्या या उत्सवाला मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावतात.

हेही वाचा >>> बदलापूर शहरात हिवसाळय़ाचा अनुभव ; पुणे, नाशिकपेक्षा तापमानात घट; एकाच वेळी पाऊस आणि धुके

गेल्या दोन वर्षात करोना महासाथीमुळे रासरंग उत्सव रद्द करण्यात आला होता. फाऊंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून डी.एन.सी. शाळेच्या पटांगणावर हा उत्सव रंगणार आहेनऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट १६ चे वाद्यवृंद कार्यक्रमात संगीत संयोजन करतील. अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शहा, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गाडा या कलावंताचे सादरीकरण होणार आहे. त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सुत्रसंचालनाची जोड मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रासरंग उत्सवाला हजेरी लावणार आहेत. या उत्सवात विविध स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षिसांची लयलूट आहे. महिलांसाठी भोंडला तसेच कुंकूमाकर्चन सुद्धा पार पडणार आहे, असे शहरप्रमख राजेश मोरे यांनी सांगितले.