डोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन | Organized Navratri festival in Dombivli through Dr Srikant Shinde Foundation amy 95 | Loksatta

डोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन

डोंबिवली शहरात आयोजित केला जाणार भव्य रासरंग कार्यक्रम डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो.

डोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन
( संग्रहित छायचित्र )

करोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा नवरात्रोत्सव २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर कालावधीत डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर आयोजित केला आहे. सुमारे एक लाखाहून अधिक नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत, असे शहरप्रमुख राजश मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…

डोंबिवली शहरात आयोजित केला जाणार भव्य रासरंग कार्यक्रम डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. उपनगरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव म्हणूनही या रास रंग या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. तरुण- तरुणींसह अबाल आणि ज्येष्ठ नागरिकही या उत्सवाची प्रतीक्षा करत असतात. मराठमोळ्या भोंडल्याला गुजराती बांधवांच्या गरब्याचा साज या रासरंग उत्सवाच्या निमित्ताने मिळतो. दरवर्षी एक लाखांहून अधिक जण या उत्सवात हजेरी लावत असतात. खा. शिंदे यांच्या या उत्सवाला मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावतात.

हेही वाचा >>> बदलापूर शहरात हिवसाळय़ाचा अनुभव ; पुणे, नाशिकपेक्षा तापमानात घट; एकाच वेळी पाऊस आणि धुके

गेल्या दोन वर्षात करोना महासाथीमुळे रासरंग उत्सव रद्द करण्यात आला होता. फाऊंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून डी.एन.सी. शाळेच्या पटांगणावर हा उत्सव रंगणार आहेनऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट १६ चे वाद्यवृंद कार्यक्रमात संगीत संयोजन करतील. अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शहा, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गाडा या कलावंताचे सादरीकरण होणार आहे. त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सुत्रसंचालनाची जोड मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रासरंग उत्सवाला हजेरी लावणार आहेत. या उत्सवात विविध स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षिसांची लयलूट आहे. महिलांसाठी भोंडला तसेच कुंकूमाकर्चन सुद्धा पार पडणार आहे, असे शहरप्रमख राजेश मोरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाण्यातील मखमली तलावात आढळला मृतदेह

संबंधित बातम्या

ठाणे पोलिसांचे मध्यरात्री कोंबिग ऑपरेशन; १८४ जणांना अटक
ठाकुर्ली चोळे गावात कल्याण-डोंबिवली पालिकेचे डायलिसिस केंद्र; लाभार्थींना लाभ देण्याची शिवसेनेची मागणी
ठाणे : महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
ठाणे: दारुच्या नशेत गाडी चालवणे जीवावर बेतले; दोन तरुण ठार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यशासन ऊसदर प्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देईल; शेतकरी संघटनांची अपेक्षा
‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र