पालकांची ‘लोकसत्ता’ला माहिती

Badlapur School KG Girl Sexual Abuse आदर्श विद्या मंदिरमधील बालिकांच्या लैंगिक शोषणप्रकरणी दोघींपैकी एकीच्या पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडित बालिकेचा वैद्याकीय अहवाल घेऊन शाळेत गेले असता ‘सायकल चालविताना दुखापत झाली असेल,’ असा संतापजनक दावा मुख्याध्यापकांनी केल्याचा गौप्यस्फोट पालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीही धमकाविल्याचा आणि छळ केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे.

बदलापूरच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने होत असताना शाळा आणि पोलिसांनी दाखविलेल्या अमानुष प्रवृत्तीचे दाखले आता समोर येऊ लागले आहेत. एका बालिकेच्या पालकांनी ‘लोकसत्ता’कडे मन मोकळे करताना यंत्रणांचा हा संतापजनक कारभार चव्हाट्यावर आणला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ ऑगस्टला सफाई कामगाराने दोन बालिकांवर कथितरीत्या लैंगिक अत्याचार केले आहेत. यातील एकीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर तिच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे समोर आले. १६ ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले. मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडले असावे, असे निरर्थक दावे करत अहवाल फेटाळून लावला. त्यानंतर पालक तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. साधी तक्रार दाखल करून घेण्यास १२ तास लावले. अखेर स्थानिक मनसे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. या तक्रारीतही पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे.

indefinite satyagraha protest in front of palghar collectorate
श्रमजीवी सत्याग्रहातील कोंडी फुटेना; सुमारे आठ हजार नागरिकांचा सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
strike the employees of the motor vehicle department for various demands pune news
‘आरटीओ’तील संपात मध्यस्थ तेजीत! नागरिकांकडून राजरोस जादा पैशांची लूट सुरू; अधिकारी बघ्याच्या भूमिकेत
University of Mumbai, Artificial Intelligence Model,
कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप

हेही वाचा >>> बदलापूर आंदोलनातील आंदोलक ‘बदलापूरकरच’; आंदोलनातल्या २५ अटक आरोपींपैकी २३ जण ‘बदलापूरकर’

सर्वांवर ‘पॉक्सो’ कारवाई कधी?

‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत अत्याचाराच्या घटनांची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन एफआयआर दाखल करणे गरजेचे असते. मात्र अशा वेळी प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणारी संबंधित व्यक्ती, संस्था, अधिकारी तसेच तक्रार दाखल करून घेण्यास दिरंगाई करणारी व्यक्ती, संस्था, अधिकारीदेखील कायद्यान्वये सहआरोपी असतात. बदलापूरमधील घटनेत शाळा व्यवस्थापनातील व्यक्ती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन कनिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

शाळापोलिसांचे साटेलोटे?

●प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

●त्यामुळेच केवळ पोलीस ठाणे नव्हे, तर रुग्णालयातही दीर्घकाळ प्रतीक्षा करण्यास भाग पाडल्याचा पालकांचा आरोप आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सरकारी रुग्णालयात वैद्याकीय चाचणी होणार होती.

●मात्र पोलीस तेथे उशिरा पोहोचले. त्यामुळे पीडित मुलीला शारीरिक त्रास होत असतानाही बरेच तास तेथे थांबावे लागले. पालकांनाही तासनतास थांबविल्यामुळे मनस्ताप झाला.

या प्रकरणी दोन स्वतंत्र एफआयआर दाखल होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. सद्या:स्थितीत जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या देखरेखीखाली दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होण्यास मदत होईल. – रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे.