बदलापूर : येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे धुमसत असलेले बदलापूर शहरातील वातावरण गुरुवारी शांत होते. शहरातील सर्व दुकाने, व्यापारी संकुले आणि शाळा नियमित स्वरूपात सुरू होत्या. मात्र आपल्या मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर चिंता कायम दिसून आली. तर कोणतेही घटना घडू नये म्हणून आदर्श शाळेसमोरील पोलीस बंदोबस्त कायम होता.

बदलापूर शहरातील आदर्श विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी हजारो बदलापूरवासी रस्त्यावर उतरले आणि उग्र आंदोलन केले. या आंदोलनाला आलेल्या हिंसक स्वरूपामुळे मंगळवारी शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता, तर परिस्थिती सावरण्यासाठी लावलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे शहराला पोलीस छावणीचे रूप आले होते. याचे पडसाद बुधवारीदेखील शहरात दिसून आले.

chembur chawle fire
चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक, चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरला
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
death of youth, procession, Vadgaon Sheri, Pune,
पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?

हेही वाचा >>> अंबरनाथमध्ये ३५ वर्षांच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी बदलापूर शहरात धाव घेत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. तर कोणत्याही अफवा पसरू नये यासाठी संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व शाळा, दुकानेदेखील बंद होते. यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. तर गुरुवारी मात्र शहरातील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. सर्व दुकाने, व्यापारी संकुले, शाळा, महाविद्यालय सुरू झाली होती. यावेळी आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनी हजेरी लावली होती. शाळेत पाल्याला सोडण्यासाठी रिक्षा, बस यांची सुविधा असतानादेखील गुरुवारी मात्र पालकांनी स्वत: उपस्थित राहून आपल्या लहानग्यांना शाळेत सोडले. तर त्यांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठीदेखील मोठी गर्दी केली होती. यामुळे शाळा जरी सुरू झाल्या असल्या तरी त्यांचे पालक भेदरलेल्या अवस्थेत दिसून आले.

अजित पवार यांना गृहखाते द्या विद्या चव्हाण

राज्याचे गृहखाते हे अजित पवार यांच्याकडे द्यावे. ते कडक स्वभावाचे आहेत, ते नीट पद्धतीने सांभाळू शकतील. कारण देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेण्याकडे त्यांचे जास्त लक्ष आहे. त्यामुळे त्यांना गृहखाते सांभाळता येत नाही, अशी टीकाशरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी बदलापूर येथे केली.

घटनेचे सीसीटीव्ही चित्रण गायब पटोले

नंदुरबार : बदलापूर घटनेचे सीसीटीव्ही चित्रण गायब करण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. संबंधित शाळा भाजपशी संबंधित असल्यानेच पोलिसांवर दबाव होता. पालक संस्था चालकांकडे गेल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. १२ आणि १३ तारखेला घटना झाल्यानंतर संबंधित सीसीटीव्ही चित्रण या लोकांनी गायब केले असल्याचा आरोप पटोले यांनी केला. काही सामाजिक संस्थांनी दबाव आणल्यानंतर पोलिसांना नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागल्याचे पटोले यांनी सांगितले.

योजनेच्या जाहिरातीवर दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी राज्यातील ‘लाडकी बहीण’ असुरक्षितच आहे’. बदलापूर, कोल्हापूर, सातारा, दौंड या भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्यानंतरही गृह विभागाकडून अपेक्षित कारवाई केली गेली नाही. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

शाळा सुरू झाल्या मात्र मुलीला शाळेत सोडताना सतत तिची चिंता होती. घडलेल्या घटनेमुळे मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच गेले दोन दिवस शहरात झालेल्या उग्र आंदोलनामुळे पुन्हा काही विपरीत घटना तर नाही होणार ना? अशी सतत चिंता होती. – पालक, बदलापूर