लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी दहीहंडी निमित्त मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर स्वागत कमानीचा फलक लावला होता. जोरदार वाऱ्यांमुळे हा या कमानीचा काही भाग मंगळवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Prime Minister Narendra Modi with Israeli counterpart Benjamin Netanyahu
Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
558 people have died in Israel attacks
इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ५५८ जणांचा मृत्यू; लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
seven women burnt by firecrackers during Ganpati immersion in umred
Video : फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा

ही माहिती मिळताच तात्काळ वाहतूक पोलीस, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन दिवसांपासून मुसळधार पावसाबरोबर जोरदार वारे वाहत आहेत. चक्कीनाका भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी रस्त्याच्यांकडेला स्वागत कमानी उभारल्या होत्या. त्यावर त्यांच्या प्रतीमा आणि गोविंदा पथकांचे स्वागत करण्यात आले होते. स्वागत कमानीचा काही भाग रस्त्यावर पडला. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने या रस्त्यावर वर्दळ कमी होती. काही वाहने या भागातून त्या वेळेत जात होती. पण ती काही अंतरावर असल्याने अपघातापासून बचावली.

आणखी वाचा-महायुतीच विधानसभेची हंडी फोडणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलीस, वाहतूक पोलीस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ तुटलेल्या कमानीचा भाग रस्त्यावरून हटविला. रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. विशाल पावशे यांनी आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटातून कल्याण पूर्व मतदारसंघातून लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेत सध्या ते विविध प्रकारचे फलक लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

घाटकोपर मधील फलक दुर्घटना घडूनही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन बेकायदा फलकांकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय फलकांवर कारवाई केली की राजकीय मंडळी खासगीतून अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. पालिकेत नगरसेवक म्हणून आलो की बघून घेण्याची धमकी देतात. त्यामुळे अधिकारी वर्ग राजकीय फलकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समजते. पालिकेत स्थानिक एकही वजनदार अधिकारी राहिलेला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर धाक ठेवेल, अधिकाऱ्यांचे संरक्षण करील, असा एकही स्थानिक अधिकारी आता पालिकेत राहिला नसल्याने मागील ३० वर्षापासून पालिकेत सेवा करत असलेले कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा-कल्याणमध्ये माजी आमदाराच्या औषध विक्री दुकानात चोरी

अनेक जण यासाठी निवृत्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची आठवण काढतात. पालिका कर्मचारी तो प्रशासनात काम करतो ना तर त्याची काही चूक असेल तर घरत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायचे. पण, बाहेरील कोणीही राजकीय व्यक्ति, वजनदार इसम पालिका कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत असेल तर मात्र ते त्यालाही आपल्या क्षमतेप्रमाणे जागा दाखवून त्या पालिका कर्मचाऱ्याला पाठबळ द्यायचे, असे काही पालिका कर्मचारी आता सांगतात.