कल्याण – कल्याण-सीएसएमटी या सकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या अतिजलद वातानुकूलित लोकलच्या दरवाजाचा एक भाग स्वयंचलित पद्धतीने मागील १० दिवसांपासून उघडत नसल्याने प्रवाशांची लोकलमध्ये चढताना तारांबळ उडत आहे.

कल्याण-सीएसएमटी सकाळी आठ वाजून ५९ मिनिटांच्या लोकलच्या मधल्या (डबा क्र. ७०५४) डब्याजवळील स्वयंचलित दारात हा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक प्रवाशांनी स्वयंचलित दरवाजाचा एक भाग उघडला जात नाही, अशी तक्रार मध्य रेल्वेच्या वरिष्ठांपर्यंत स्वत: कार्यालयात जाऊन, काहींनी ऑनलाइन माध्यमातून केली आहे. प्रवाशांना लवकरच दुरुस्ती केली जाईल, अशी उत्तरे गेल्या १० दिवसांपासून अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत. कल्याणहून मुंबईला जाणारी ही लोकल अतिजलद आणि वातानुकूलित असल्याने प्रवाशांची या लोकलला गर्दी असते. डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकात या लोकलला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असतो.

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

हेही वाचा – चंद्रपूरच्या जंगलात आढळला औषधीयुक्त गुणांचा अतिशय दुर्मिळ पिवळा पळस

कडक उन्हाचे दिवस सुरू झाल्याने सामान्य लोकलमधील डब्यातून प्रवास करणारे अनेक प्रवासी घामाच्या धारा थांबविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वातानुकूलित लोकलने प्रवास करत आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत कल्याण-सीएसएमटी सकाळच्या ८.५९ लोकलच्या मधल्या डब्याचा दरवाजाचा एक भाग उघडला जात नसल्याने दरवाजाच्या एका भागातून डब्यात प्रवेश करताना प्रवाशांची तारांबळ उडते. विशेष करून महिलांना प्रवाशांची ओढणी, साडीचा पदर, प्रवाशांच्या पाठीला लावलेल्या पिशवीचा पट्टा बंद दरवाजाचा हूक किंवा बिजागराला अडकून फाटण्याचे, तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या डब्यात चढताना प्रवाशांना विशेष काळजी घेऊन चढावे लागते.

रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर बंद दरवाजाची दुरुस्ती करून तो पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी प्रवासी करू लागले आहेत. काही प्रवासी संघटनांनी हा विषय रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलचा दरवाजा स्वयंचलित पद्धतीने उघडत नसल्याची बाब पहिल्याच दिवशी निदर्शनास आली होती. त्याच दिवशी तंत्रज्ञांनी दरवाजा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तांत्रिक अडचण गुंतागुंतीची आहे. या दरवाजाचा बिघडलेला सुटा भाग बदलणे आवश्यक आहे. तो सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने दरवाजाची दुरुस्ती रखडली आहे. हा भाग मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो सुटा भाग मिळाला की दरवाजा पूर्ववत होईल.

हेही वाचा – वर्धा : रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा अन् स्थानिक प्रशासनाचा काळजाचा ठोका चुकतो तेव्हा..

मध्य, पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल नियमित धावत आहेत. या लोकलचे नादुरुस्त होणारे आवश्यक सुटे भाग रेल्वे प्रशासनाने आपल्या कार्यशाळेत उपलब्ध करून ठेवावेत. जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. सुटा भाग नाही म्हणून लोकल बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.