डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर दर सोमवारी फेरीवाल्यांचा बाजार पदपथ, रस्ता अडवून भरत असल्याने पादचारी, परिसरातील व्यापारी, वाहन चालक त्रस्त आहेत. फेरीवाल्यांचा डोंबिवली पूर्व भागात मानपाडा रस्त्यावर भरणारा बाजार कायमस्वरुपी बंद करावा, अशी मागणी अनेक रहिवाशांनी फ प्रभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

अनेक तक्रारी करुनही फ प्रभागातील अधिकारी, फेरीवाला हटाव पथकातील कामगार फेरीवाले कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मानपाडा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. शिळफाटा मार्गे येणारी जाणारी सर्व वाहने या रस्त्याने येजा करतात. मानपाडा रस्ता बाजारपेठेत येतो. रेल्वे स्थानकातून अनेक नागरिक पायी या रस्त्याने येजा करतात. वर्दळीच्या भागात पदपथ, रस्ता अडवून फेरीवाल्यांचा बाजार भरतो. स्वस्तात वस्तू मिळत असल्याने नागरिक या रस्त्यावर गर्दी करतात.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

हेही वाचा >>> द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले; चित्रपटाचे निर्माते वपुल शहा यांची टिका

यापूर्वी हा बाजार रेल्वे स्थानक भागात भरत होता. डोंबिवली पूर्व भाग ग आणि फ प्रभागाच्या हद्दीत येतो. ग प्रभाग हद्दीतील रामनगर, उर्सेकरवाडी, राॅथ रस्ता, पाटकर रस्ता भागात एकही फेरीवाला बसणार नाही. आणि सोमवारचा बाजार भरणार नाही याची दक्षता ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे आणि त्यांचे पथक घेते. फ प्रभागात ही काळजी का घेतली जात नाही, असे प्रश्न नागरिक करतात.

हेही वाचा >>> डोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त

मागील नऊ महिन्याच्या कालावधीत ग प्रभागातील सर्व रस्त्यांवरील फेरीवाले हटविण्यात ग प्रभाग अधिकाऱ्यांना यश आले आहे. डोंबिवली पश्चिमेतील ह, अ, आय प्रभाग हद्दीत एक फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही असे नियोजन संबंधित साहाय्यक आयुक्तांनी केले आहे. फ प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांवर येथील फेरीवाला हटाव पथकाकडून कारवाई का केली जात नाही, याची चौकशी करण्याची मागणी जागरुक नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूक अधिकाऱ्यांनी मानपाडा रस्त्यावरील बाजार बंद करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

हेही वाचा >>> ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी

दर सोमवारी मानपाडा रस्त्यावर फेरीवाल्यांचा बाजार भरतो. हे माहिती असुनही फ प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक पालिकेच्या आवारात गप्पा मारत बसलेले असतात. नागरिकांनी तक्रारी केल्या की तेवढ्या पुरती जुजुबी कारवाई करून माघारी येतात. काल असाच प्रकार फ प्रभाग फेरीवाला हटाव पथकांनी केला, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी फ प्रभागातच फेरीवाला का बसतात याची बारकाईने माहिती घ्यावी. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. मानपाडा रस्त्यावरील फेरीवाला बाजारावरुन गेल्या वर्षी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी फ प्रभाग अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या होत्या. अशाप्रकारे बाजार भरणार नाही याची दक्षता घेण्याची तंबी दिली होती. फेरीवाले बसणार नाहीत याची काळजी घेतली जाते. काल फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.