Mumbra Marathi Language Dispute: काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका इमारतीमध्ये क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद मराठी-अमराठी वादापर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळालं. एका अमराठी व्यक्तीनं मराठी व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. आता मुंब्र्यात घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. एका तरुणाने ‘मराठीत बोला’ असं सांगितल्यामुळे तिथे त्याला धमकावण्यात आलं आणि व्हिडीओसमोर माफी मागायला लावल्याची घटना उघड झाली आहे. यावरून आता मनसेनं गंभीर शब्दांत इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

हा सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी ४च्या सुमारास मुंब्र्यातील कौसा भागात घडला. सदर २१ वर्षीय तरुण या भागात एका फळ विक्रेत्याकडे फळं खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्ह फळविक्रेत्यानं हिंदीत संवाद सुरू केल्यावर सदर तरुणाने त्याला ‘मराठीत बोला’ असं सांगितलं. त्यावरून फळविक्रेता व तरुणामध्ये वाद झाला. यानंतर फळ विक्रेत्यानं त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही बोलावलं. आसपास गर्दी जमा झाली. या सगळ्यांनी मिळून सदर तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडलं. यावेळी जमलेल्या व्यक्ती सदर तरुणानं शिवीगाळ केल्याचाही दावा करत होती.

News About Ranvir allahbadia
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह पाच जणांविरोधात ‘या’ राज्यात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्याचं प्रकरण भोवलं
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Mumbai Police begins investigation into YouTuber Ranveer Allahabadia case
युट्यूबर रणवीर अलाहबादिया प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू
mamata kulkarni News
Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीचं वक्तव्य; “असं वाटलं की आत्महत्या करावी, मी अनेकदा प्रयत्नही…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbra News: मराठी बोलण्यास सांगितल्याने तरुणाला कान पकडून माफी मागण्यास पाडले भाग

या घटनेचा व्हिडीओ जमलेल्या लोकांपैकीच एकानं काढून व्हायरल केला आहे. या घटनेनंतर त्यातल्याच एकानं सदर तरुणाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल केली. यानंतर पोलिसांनी सदर तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्याची चौकशी केली.

“मला भीती वाटतेय”

दरम्यान, आज पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाल्यानंतर सदर तरुणानं आपल्याला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. “त्यांनी मला शिवीगाळ केली. मी म्हटलं शिव्या देऊ नका. तर त्यानंतर मला म्हणाले माफी माग. मी माफीही मागितली. पण मला नंतर पोलीस स्टेशनमध्ये चार तास बसवून ठेवलं. माझ्या आईलाही स्टेशनबाहेर बसवून ठेवलं. माझी आई घाबरली आहे. पुढच्या वेळी मुंब्र्याला आल्यानंतर मला काही झालं तर काय अशी भीती आम्हाला वाटते आहे. त्यांच्यातल्याच एकानं माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे”, अशी प्रतिक्रिया सदर तरुणानं दिली आहे.

मनसेची आगपाखड, दिला इशारा

दरम्यान, या तरुणानं मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या काही दिवसांत मराठी माणसाच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. मुंब्र्यातली ही घटना दुर्दैवी आहे. मराठी भाषेवरून वाद झाल्यानंतर तिथे काही मुसलमान मुलं जमली. त्यांनी व्हिडीओही रेकॉर्ड केला. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असं म्हणतात आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात? यांची एवढी हिंमत कशी होते?” असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

“असंच घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व संकटात येईल. कल्याण, ठाणे, विरार, मुंबईत घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर सत्तापरिवर्तन झाल्यानंतर यांच्यातली हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचं दिसतंय. मुंब्र्यातल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि तिथे घोषणाबाजी केली. हे करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय यावरून तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करणार?”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

“त्या दिवशी राज ठाकरेंची किंमत कळेल”

“यानंतर महाराष्ट्रात पुढे भाषिक वाद सुरू झाला, तर कुणी त्यावर बोलू नये. भविष्यात हे हल्ले वाढतील. यांना आत्ताच ठेचलं नाही, तर भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल. माझी मराठी माणसाला विनंती असेल की वेळेवरच एकत्र या. नाहीतर जोपर्यंत तुम्हाला कुणी फटके मारत नाही तोपर्यंत तुम्ही लांबून बघत राहणार असाल, कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल. त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

Story img Loader