scorecardresearch

उंबार्ली टेकडीवर १ हजार देशी झाडांची लागवड ; पर्यावरण प्रेमींच्या पुढाकाराने वृक्षारोपण

शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

उंबार्ली टेकडीवर १ हजार देशी झाडांची लागवड ; पर्यावरण प्रेमींच्या पुढाकाराने वृक्षारोपण
उंबार्ली टेकडीवर मागील दोन महिन्याच्या कालावधीत सुमारे १ हजार देशी प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले आहे.

ठाणे – डोंबिवली शहराला लाभलेली मोठी वनसंपदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली टेकडीवर मागील दोन महिन्याच्या कालावधीत सुमारे १ हजार देशी प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले आहे. शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

डोंबिवली शहरातील भोपर, गणेश घाट आणि प्रामुख्याने उंबार्ली टेकडी परिसरात मागील काही महिन्यांपासून परदेशातील आणि स्थानिक मात्र दुर्मिळ अशा पक्ष्यांचा वावर वाढला आहे. यामुळे अनेक पर्यावरण प्रेमींकडून आणि पक्षिनिरीक्षकांकडून या ठिकाणी भेटी देत आहेत. यामुळे वाढत्या शहरात टिकून राहिलेल्या या जंगल परिसराचे महत्व वाढले आहेत. यामुळे हा जंगल परिसर टिकविण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था आणि पर्यावरण प्रेमींकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

मागील वर्षीही काही सामाजिक संस्थांकडून उंबार्ली टेकडी परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचे स्वच्छ करण्याची आणि नव्याने काही जलस्रोत उभारण्याची मोहीम राबविण्यात आली होती. याचेच फलित म्हणून यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात देखील उंबार्ली टेकडी परिसरात हिरवळ टिकून राहिली होती. अशाच पद्धतीने मागील दोन महिन्यांच्या कालावधीत डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील काही सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या पुढाकाराने उंबार्ली टेकडी परिसरात सुमारे एक हजार देशी प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी मंगेश कोयांडे यांनी दिली आहे.

या देशी झाडांची लागवड

वड, पिंपळ, उंबर, चिंच, कडुनिंब, करंज, आंबा, बदाम, फणस, आवळा, पळस, सोंनसावर, मोह, सुरुंगी, हिवर, साग, हिरडा, सालई, शिरीष, लकुच, महारुद्र, शिसंम, शिवण, रिठा, रोहितक, भुत्या, बेहडा, मोई, रुद्राक्ष, बेल, बिब्बा, वाळुंज, भोकर, वावळ, मुचकुंद, बुर्र्गुंड, भेरुला माड, दुरुंगी बाभूळ, बोंडारा बोर, मेड शिंघी, ऐन, कुंभ, पांगरा, सावर, ताम्हण, वरुण, भेंड, सातवीण, पुत्रांजीवा, अर्जुन, बीजा, नागचाफा, अंकाळा, कवठ, तेंदू यांसारख्या झाडांची उंबार्ली टेकडी आणि आजूबाजूच्या परिसरात लागवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या