scorecardresearch

Premium

भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू

भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

death
रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडकी. तपन बिस्वास( ४६)असे या मयत खेळाडूचे नाव आहे

World Cup 2023: Rishabh Pant's entry in the World Cup Having fun with the players of Team India watch the video
World Cup 2023: ऋषभ पंतची वर्ल्डकपमध्ये एन्ट्री! टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर करतोय मजामस्ती, पाहा Video
IND vs AUS 3rd ODI Match Updates
VIDEO: उष्णतेमुळे दमलेल्या स्टीव्ह स्मिथने बसण्यासाठी मैदानातच मागवली खुर्ची, विराट कोहलीने घेतली मजा
child death due to accidentally hanging at home
गोंदिया : जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू, एक महिला गंभीर
mumbai man falls into drain, man dies after falls in drain while collecting plastic bottles, plastic bottles death
प्लास्टिकच्या बाटल्या काढताना नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू

फुटबॉलची आवड असल्यामुळे तपन एका फॉटबॉल क्लब मध्ये जोडलेला होता. गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील सुभाष चंद्र बोस मैदानात फुटबॉल खेळत असताना त्याला अचानक थकवा जाणवू लागला. त्यामुळे छातीत आणि पायात दुखत असल्याचे सांगत तो मैदानाबाहेर जाऊन बसला. काही वेळ बसल्यानंतर अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

इतर खेळाडूंनी हे पाहताच त्याला तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मागील महिन्यात देखील वसईत ईनोसंट रिबेलो (२७) या तरुणाचा फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Player dies of a heart attack while playing mrj

First published on: 15-09-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×