ठाणे : कोयत्याने केक कापून गावात दहशत पसरविणाऱ्या नवेश पाटील उर्फ नवा भाई (३१) याला भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून २४ इंच लांबीचा कोयता जप्त केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेतील कार्यालय वापरण्यास बंदी घाला अन्यथा आंदोलन करू: शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांचा इशारा

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
kumar pillai establish new gang after controversy with chhota rajan
अधोविश्व : कुमार पिल्लई, छोटा राजनशी वाद आणि नवी टोळी

मागील काही दिवसांपासून पुण्यात भररस्त्यात कोयते उगारून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच भिवंडीतही पिंपळघर भागात सुमारे दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने कोयत्याने केक कापल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण पसरले होते. याची माहिती कोनगाव पोलिसांना मिळाल्यानंतर कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नवेश पाटील उर्फ नवा भाईला ताब्यात घेतले. त्याच्या घरात झडती घेतली असता पोलिसांना एक कोयता आढळून आला. यानंतर पोलिसांनी नवेशला अटक केली. पोलीस कलम कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.