टिटवाळा भागात बुवा म्हणून प्रसिद्ध असलेला आणि उपहारगृह चालवित असलेल्या एका मालकाने महिलेचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या बुवाने उपहारगृहात आलेल्या महिलेचा कौशल्याने मोबाईल मिळवून तिच्याशी संपर्क वाढवून नंतर वेळोवेळी तिच्याशी शारीरिक लगट करून तिचा मानसिक, शारीरिक छळ केला. बुवाचा त्रास असह्य झाल्याने या महिलेच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी बुवाविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला. त्याला रात्रीच अटक केली.

बुवाविरुद्ध महिलेने अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. संपत शिरसाट उर्फ बुवा असे आरोपीचे नाव आहे. बुवाचे टिटळ्यामध्ये उपहारगृह आहे. बुवा स्वत: उपहारगृहाच्या गल्ल्यावर बसतो. तो अनेकांचा परिचय करून घेतो. गेल्या वर्षी बुवाच्या उपहारगृहात एक महिला शासकीय अधिकारी दुपारच्या वेळेत भोजनासाठी आल्या होत्या. बुवाने त्यांच्याशी बोलणे सुरू करून तुमचा कार्यालयीन कर्मचारीही येथे भोजनासाठी येणार असल्याची माहिती दिली. या गोड बोलण्यातून त्याने महिला अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर तो महिला अधिकाऱ्याच्या सतत संपर्कात राहू लागला. महिला अधिकारी वेळ मिळेल तेव्हा भोजनासाठी बुवाच्या हॉटेलमध्ये येत होत्या. बुवाने बोलण्यातून महिलेचा विश्वास संपादन केला.

स्वत:च्या वाढदिवशी बुवा रात्रीच्या वेळेत पीडित महिलेच्या घरी गेला. त्याचे आदरतिथ्य केल्यानंतर बुवाने त्या महिलेला मी तुमच्या बरोबर लग्न करीन असे सांगून काही कळण्याच्या आत त्या महिलेच्या मनाविरुद्ध जाऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितने बुवाची माहिती काढली. त्यावेळी त्याचे लग्न झाले असून पत्नी, दोन मुले आहेत असे पीडितेला समजले. तिने त्याच्या बरोबरचे संबंध तोडून टाकले. महिला अधिकारी आपला तिरस्कार, टाळते हे लक्षात आल्यावर बुवाने या महिलेबरोबर मोबाईलमध्ये काढलेली अश्लिल छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी पीडितेला देऊ लागला. गाळा खरेदीसाठी पैसे मागू लागला. ते न दिल्याने एक दिवस पीडितेला त्याने चामडी पट्ट्याने मारहाण केली. बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी बुवा अनेकांकडून पैसे उकळत होता, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिला बुवाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने बुवाने तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू केला होता. हा त्रास असह्य झाल्याने पीडितीने रविवारी टिटवाळा पोलीस ठाण्यात संपत शिरसाट उर्फ बुवा विरुध्द तक्रार केली. त्या आधारे पोलिसांनी बुवाविरुद्ध