scorecardresearch

ठाणे : दुचाकी आणि सोनसाखळी चोर अटकेत

नुरमोहम्मद हानिफ अन्सारी (१९) आणि शब्बीर खान (२७) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

CRIME AND ARREST
(फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)

भिवंडी शहरात दुचाकी आणि सोनसाखळी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. नुरमोहम्मद हानिफ अन्सारी (१९) आणि शब्बीर खान (२७) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. भिवंडी शहरात दुचाकी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरात गस्ती घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, साहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी पथके तयार केली होती.

हेही वाचा >>> ठाकुर्लीतील विकासक, ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील तीन जिल्ह्यांतून दीड वर्ष तडीपार

दरम्यान, भिवंडीतील शांतीनगर भागात दुचाकी चोर येणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून हानिफ आणि शब्बीर या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी शांतीनगर भागात दोन दुचाकी, एक सोनसाखळी आणि नारपोली भागात एक दुचाकी चोरल्याची कबूली दिली. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 18:45 IST