पुणे येथील एका नामवंत कंपनीत डेटा इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका २७ वर्षाच्या तरूणीला एका क्रीडा प्रशिक्षकाने बेदम मारहाण करून शरीराला इजा होईल अशा दुखापती केल्या आहेत. लग्नाचे आमीष दाखवून या क्रीडा प्रशिक्षकाने तरूणीला नऊ वर्षापासून आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करत होता. चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण, तिचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत होता. हे प्रकार वाढत चालल्याने अखेर अभियंता तरूणीने मानपाडा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री या क्रीडा प्रशिक्षकाविरूध्द तक्रार केली.

या क्रीडा प्रशिक्षकाविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, मारहाण, धमकावणे कलमान्वये गुन्हा दाखल केला. रामेश्वर बाळू पाठक (३१, रा. रेडी कम्पाऊंड, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व) असे क्रीडा प्रशिक्षकाचे नाव आहे. तरूणी डेटा इंडजिनयर असून ती घरातून पुणे येथील कंपनीतील कार्यालयीन काम करते.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Mumbai, Fire Breaks Out, Government Building bandra, Fire Government Building bandra, bandra news, fire news, fire in bandra, mumbai news, marathi news, fire brigade, firefighters,
वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डोंबिवली एमआयडीसीत राहणारी एक तरूणी याच भागातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत होती. ती सॉफ्ट बॉल, बेस बॉल खेळात निपुण आहे. शाळेत असताना तिची निवड जळगाव येथील राज्यस्तरिय स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेच्यावेळी क्रीडा प्रशिक्षक म्हणून रामेश्वर बाळू पाठक यांनी नेतृत्व केले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून तरूणी आणि रामेश्वर यांची ओळख झाली. ओळखीची रूपांतर प्रेमात झाले. एक दिवस रामेश्वर यांनी तरूणीला घरी नेले. मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. रामेश्वर, तरूणी विविध ठिकाणी फिरायला जात होते. मोबाईलवर सतत बोलणे होत होते.

सन २०१९ मध्ये रामेश्वर याच्या स्वभावात बदल होऊन तो तरूणीला तु कोणा मुलाशी बोलायचे नाही असे सांगू लागला. तेव्हापासून तो तरूणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. तू कोणा बरोबर बोललीस तर तुझी बदनामी करीन, अशी धमकी देत होता. लग्न होणार असल्याने तरूणी ते सहन करत होती. गेल्या महिन्यात तरूणीची बहिण आईच्या घरी आली होती. हे रामेश्वरला समजले. त्याने तरूणीला संपर्क करून तुझी बहिण घरी आली आहे हे मला का सांगितले नाहीस, असे मोबाईलवर दरडावून विचारून तिला त्याच्या घराजवळील रेडी कम्पाऊंड जवळ भेटायला बोलविले. तरूणी दुचाकीवरून त्याला भेटायला गेली. रामेश्वरने बहिण आली आहे हे का मला सांगितले नाही, असे विचारून तिला मारहाण सुरू केली. लोखंडी सळईने तिच्या दोन्ही पायांवर प्रहार केले. तरुणीच्या कानातून रक्त येत होते. तशा परिस्थितीत तरूणी लगंडत घरी आली. घरात तिने दुचाकी स्टॅन्ड आपल्या पायाला लागला आहे असे खोटे सांगितले. वडिलांनी तरूणीला खासगी दवाखान्यात नेले. त्रास असह्य झाल्याने एका हाडांच्या डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथील डॉक्टरनी एक्स रे काढल्यानंतर तरूणीच्या पायाच्या घोट्याच्या वरती हाड मोडले असल्याचे सांगितले.

गेल्या १५ दिवसापूर्वी तरूणीचे भुसावळ येथील मामा वारले. तरूणीसह कुटुंब भुसावळला गेले होते. त्यावेळी रामेश्वर तरूणीला संपर्क करून ‘तुझी अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करतो’ अशी धमकी देऊ लागला. मामाचे विधी कार्य उरकून तरूणी कुटुंबासह रविवारी (ता.२४) भुसावळहून डोंबिवलीत परतली. तिने प्रियकर रामेश्वरकडून सुरू असलेला त्रास कार्यालयीन सहकाऱ्याला सांगितला. कर्मचाऱ्याने मुलीच्या आई, वडिलांना घडला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून पालक हैराण झाले. त्यांनी रविवारी रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन रामेश्वर पाठक याच्या विरूध्द तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.