ठाणे : मुंबई येथे झालेल्या रेल्वे अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. तो लोहमार्ग पोलीस दलामध्ये कार्यरत असल्याचे कळते आहे.

मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातांच्या प्रकरणानंतर आता प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेत विकी नावाच्या एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा कॉन्स्टेबल कल्याण येथून मुंबच्या दिशेने प्रवास करत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास अंदाजे १३ प्रवासी मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ लोकलमधून खाली पडले. या घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. एक प्रवासी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असून ३ प्रवासी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दाखल केले आहे. मृतांपैकी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेले विकी मुख्यदल हे देखील आहेत. २०१८ साली पोलीस दलात रुजू झाले होते. या घटनेने त्यांच्या घरात प्रचंड दुखाचे वातावरण तयार झाले आहे.